Uncategorized

मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून पुन्हा नवीन बसेस साठी प्रयत्न– माजी नगराध्यक्ष सचिन गोरे

अखेर प्रावाश्यांच्या सेवेसाठी आगारात नवीन पाच बसेस दाखल

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)—पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या प्रयत्नातून एकूण प्रवाशी संख्या पाहता पुन्हा नवीन बसेस जिंतूर आगारा साठी अवश्य प्रयत्न केले जातील असा विश्वास माजी नगराध्यक्ष सचिन गोरे व्यक्त केला. ते एसटी आगारात प्रदीर्घ प्रतीक्षे नंतर जिंतूर आगारात नवीन पाच गाड्या प्रवाश्यांच्या सेवे साठी नुकत्याच दाखल झाल्या सदरील नवीन दाखल झालेल्या बसेसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या बसेसच्या उद्घाटन प्रसंगी सचिन गोरे यांच्या समवेत आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण,स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे,वाहतूक निरीक्षक शरद पाटील, सुनील पंडित,माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख,डॉ पंडित दराडे,भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे,माजी नगर सेवक ऍड.गोपाळ रोकडे, भगवान वटाने,सचिन देवकर,खेत्रे आबा,चंद्रकांत बहिरट,विलास भंडारे,पिंटू चव्हाण, आगार लिपिक गुणीरत्न वाकोडे,विजय जाधव,लखुजी जाधव,रमेश गुजर,या सह प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सचिन रायपत्रेवार,उपाध्यक्ष महेश देशमुख यांचीही उपस्थिती होती.
चौकट
येथील प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सचिन रायपत्रेवार महेश देशमुख यांनी वेळोवेळी प्रवाश्याची वाढती संख्या पाहता जिंतूर आगारात नविन बसेसच्या मागणी साठी महामंडळ प्रशासण व मंत्री मेघना बोर्डीकर यांनाही वेळोवेळी निवेदना द्वारे मागणी केली होती हे विशेष.
त्यांच्या मागणीला काही प्रमाणात नूतन पाच गाड्या डेपोत प्रवाश्याच्या सेवेसाठी काही प्रमाणात यश भेटले असे निश्चित म्हणता येईल.
या पूर्वी जिंतूर आगारात 53 बसेस होत्या सदरील पाच गाड्या दाखल झाल्याने सध्या आगारात 57 गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत.
वाढती प्रवाशी व विद्यार्थिनी संख्या पाहता किमान अजूनही 10 भविष्यात पुन्हा नवीन बसेस उपलब्ध झाल्यास स्थानिक एसटी आगाराची चाललेली कसरत कमी होईल असे म्हणता येईल.कारण जरी पाच नवीन गाड्या आल्या तर उपलब्ध पूर्वीच्या 53 गाड्या पैकी काही गाड्या सुव्यवस्थित स्थितीत नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button