इटोली येथे पाणपोईची सोय: अजिंक्य स्टोन क्रेशरचा सामाजिक उपक्रम
भर उन्हाळ्यात:डोंगराळ भागात झाली पाण्याची सोय

जिंतूर-( गुणीरत्न वाकोडे)
–तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या ईटोली येथे कै. बाबाराव घुगे यांच्या स्मरणार्थ व रामनवमीचे औचित्य साधून अजिंक्य स्टोन क्रेशर चा आगळावेगळा उपक्रम साधून अजिंक्य स्टोन क्रेशर ला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बालाजी सांगळे यांनी गेल्या वर्षी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची दोन हौदाची व्यवस्था केली होती. परंतु नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी सकाळी 9:00 वाजता अजिंक्य स्टोन क्रेशर चे मालक बालाजी सांगळे यांनी थंड पिण्याचे पाणी कै. बाबारावजी घुगे यांच्या स्मरणार्थ व रामनवमी चे औचित्य साधून पाणपोईचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गोविंदराव थिटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.
या उद्घाटन प्रसंगी
जगदीश घुगे (सरपंच इटोली),संतोष राठोड सरपंच साईनगर,राजेश राठोड, सरपंच (गणेश नगर) आनंदराव राठोड (सरपंच घडोळी) अशोक घुगे,रामकिशन घुगे,बापू आप्पा कोदरे,माधु मामा जाधव बंडू होणा पांडुरंग मेनकुदळे,शरद आपा तीळकरी,भूषण गडदे,शिवाजी खुणे, संतोष, गणेश घुगे आदीची उपस्थिती होती. अजिंक्य स्टोन क्रेशर चे मालक बालाजी सांगळे यांनी भर उन्हाळ्यात डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्याची सोय केल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.