Uncategorized
एसटी आगारात 14 एप्रिल होणार उत्साहात साजरी:उद्घाटक डॉ.यशवंत खडसे यांचा होणार सत्कार
ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिस्तबद्ध पद्धतीने निघणार मिरवणूक

- जिंतूर–( गुणीरत्न वाकोडे) शहरातील एसटी आगारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होणार असून त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केलेले आहे.सर्वप्रथम सकाळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर यशवंत खडसे अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक बुध्दिराज सुकाळे तसेच स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे,वाहतूक निरीक्षक शरद पाटील, लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ, प्रल्हाद मुंढे,वाहन परीक्षक,संजीव भांबळे,अशोक देवकर,प्रमुख कारागीर निंबाळकर,सुनील पंडित,श्याम डहाळे,सह सर्व आस्थापना कर्मचारी व सर्व चालक,वाहक व सर्व कारागीर वर्ग उपस्थित राहणार आहे.
अभिवादन सत्कार कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सदरील कार्यक्रमात देशाची राज्यघटना (संविधानाची प्रत) उपस्थित मान्यवरास भेट म्हणून देण्यात येणार असून या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ.यशवंत खडसे यांच्या यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.कारण ज्यांच्या सामाजिक कार्याची व त्यांनी लिखाण केलेल्या विविध साहित्या बद्दल ज्यांचा वीसहुन अधिक ठिकाणी सन्मानीत केलेले आहे. त्यामध्ये तालुका पातळी सह हे पुरस्कार मलेशिया,नागपूर,यवतमाळ,किनवट व तालुक्यातील धमधम तसेच छ.संभाजीनगर आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते डॉ.यशवंत खडसे यांच्याकार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित केलेले आहे.सदरील सोहळ्या नंतर शिस्तबद्ध पद्धतीने ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक निघणार असल्याची माहिती जिंतूर एसटी आगार जयंती अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे सह सचिव सुनील खिल्लारे,कार्याध्यक्ष कमलाकर कनकुटे व तथागत कांबळे आदींनी केलेले आहे.तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असेही आव्हान करण्यात आलेले आहे.सर्व कार्यक्रमाची सांगता संपताच नंतर लगेच मिष्टान्न जेवण्याची सोय सुद्धा केलेली आहे.अशी माहिती सुद्धा जयंती कमिटी तर्फे देण्यात आलेली आहे.