Uncategorized

एसटी आगारात 14 एप्रिल होणार उत्साहात साजरी

उद्घाटक डॉ.यशवंत खडसे यांचा होणार सत्कार

 

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एसटी आगारात मान्यवरांच्या हस्ते विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिंतूर एसटी आगारात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.सकाळी 10 वा.प्रतिमेस अभिवादन व पूजन करुन मुख्य कार्यक्रमात उद्घाटक डॉ. यशवंत खडसे तर अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक बुध्दिराज सुकाळे तसेच स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे,वाहतूक निरीक्षक शरद पाटील,लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ,प्रल्हाद मुंढे,वाहन परीक्षक संजीव भांबळे,अशोक देवकर,प्रमुख कारागीर लिंबाळकर,सुनील पंडित,श्याम डहाळे,सर्व आस्थापना कर्मचारी,चालक,वाहक व सर्व कारागीर वर्ग उपस्थित राहणार आहेत. अभिवादन सत्कार कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सदरील कार्यक्रमात देशाचे राज्यघटना संविधानाची परत उपस्थित मान्यवरास भेट म्हणून देण्यात येणार असून या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर यशवंत खडसे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

कारण त्यांच्या सामाजिक कार्याची व साहित्यिक लिखाणाची दखल घेऊन त्यांचा वीस हुन अधिक ठिकाणी त्यांना सन्मानित करून त्यांना विविध पुरस्कार प्रदान केलेले आहे.ज्यात मलेशिया,यवतमाळ,नागपूर, किनवट,छ.संभाजीनगर तसेच तालुक्यातील धमधम आदी ठिकाणी डॉ.यशवंत खडसे यांना गौरविण्यात आलेले आहे.उपरोक्त कार्यक्रमा नंतर शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघणार असून सर्व कार्यक्रमाची सांगता झाल्या नंतर मिष्टान्न जेवण्याची सोय करण्यात आलेली आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान एसटी आगर जयंती अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे सचिव सुनील खिल्लारे, कार्याध्यक्ष कमलाकर कनकुटे व तथागत कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!