Uncategorized
श्रीमती शकुंतलाबाई विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
कार्यक्रमात कर्तत्वान महिलांच्या यशोगाथास दिला उजाळा!!!

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी खिस्ते तर प्रमुख पाहुणे अर्चना इक्कर,अश्विनी शिंदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बुधवंत यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी भोंडवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामेश्वर सावंत ,नामदेव मोधे ,संतोषी शर्मा ज्ञानेश्वरी देवकर व सौ डोंबे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला अनेक पालक महिला भगिनी उपस्थित होत्या.