मी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतच राहणार सुरेश नागरे यांची स्पष्टोक्ती:: जे सोडून भाजपमध्ये गेले त्यांना शुभेच्छा!!!
महायुतीतील अजित पवार गट तुल्यबळ:: जे आम्हाला सोडून गेले ते कधीच आमचे नव्हते अमृताताई नागरे

मी राष्ट्रवादीत राहणार– सुरेश नागरे
ज्यांनी साथ सोडली त्यांना शुभेच्छा
मी भाजप मध्ये जाणार नाही::राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जातीधर्माशी एकरूप
जिंतूर —सुरेश नागरे यांचे खंदे समर्थक ओबीसी चेहरे माजी माजी जिल्हा परिषद सदस्य नाना राऊत राजेंद्र नागरे,अविनाश काळे यापूर्वी नुकतीच मुंबई येथे सुरेश नागरे यांना सोडचिठ्ठी देत आम्हाला सत्तेत राहायचे या हेतूने मुंबई येथे भाजप प्रदेश अध्यक्ष चव्हाण माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करून घेतला.
या प्रवेशाने जिंतूर मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केल्या गेले.
कारण विधानसभेमध्ये सुरेश नागरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे ओबीसी चेहरे यांनी नागरे यांना सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुढे सुरेश नागरे यांचीही मजबूत फळी भाजपने ओढून घेतली. त्यानंतर आज सुरेश नागरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा गेला की जे मला सोडून गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.
माझी सोडचिट्टी घेण्यापूर्वी त्यांनी असे सांगितले की आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचे आहे म्हणून आम्ही भाजपमध्ये जात आहोत.
सुरेश नागरे यांनी पुढे पत्रकार परिषदेत असेही नमूद केले की मी भाजपमध्ये कधीच जाणार नाही.
मी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षातच राहणार व भविष्यामध्ये माजी आमदार विजय भांबळे व मी स्वतः अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्ष कशी भरारी देता येईल यासंबंधी मी व माजी आमदार विजय भांबळे हे प्रयत्नशील असणार – मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अफवा उठल्या होत्या पण अजित पवार यांचा (राष्ट्रवादी पक्ष) हा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळे मी सध्या अजित पवार गटांच्या राष्ट्रवादी पक्षातच राहणार असून मोठ्या जोमाने आगामी प्रत्येक निवडणुकीत माजी आमदार विजय भांबळे व मी एकत्र एकदिलाने काम करू असा खुलासा आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत युवा नेते सुरेश नागरे यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत सुरेश नागरे यांच्या समवेत त्यांच्या सुविध्य पत्नी अमृता ताई नागरे राष्ट्रवादी अजित पवार गट तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत,यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंतूर तालुक्यात महायुती मधील घटक पक्ष अजित पवार गट (राष्ट्रवादी) हा प्रत्येक निवडणुकीत आपली वेगळी चूल मांडणार हे नुकत्याच घेतलेल्या माजी आमदार विजय भांबळे व आज सुरेश नागरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदत मध्ये स्पष्ट संकेत दिल्यामुळे तालुक्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी तुल्यबळ सरळ लढत होताना दिसून येत आहे.
चौकट
जी आपली कधीच नव्हती ती आज सोडून गेली. अशी स्पष्टोक्ती आज झालेल्या सुरेश नागरे यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता ताई नागरे यांनी केली.
त्यांनी असे पुढेही सांगितले की भगवान के घर देर होती ही अंधेर नही अजित पवार गटास कोणीही कमी समजू नये भविष्यामध्ये माजी आमदार विजय भांबळे व आम्ही एकत्रित एक जीवाने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळू असे स्पष्टोक्ती अमृता नागरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पक्ष सांगेल त्या आदेशान्वये जर मला उभे राहण्याची कोणत्याही सर्कलमध्ये संधी भेटल्यास मी निवडणूक लढवणार असाही खुलासा अमृता नागरे यांनी केला.
एकूणच येणारी स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद निवडणूक) भाजप विरुद्ध अजित पवार गट चुरशीची होणार असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.


