Uncategorized
शहरातील शिवाजी नगरातच्या अष्टविनायक गणेश मंदिरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
कार्यक्रमात कर्तत्वान महिलांच्या यशोगाथेवर टाकला प्रकाश!!!

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे) शहरातील येथील शिवाजी नगरातील अष्टविनायक गणेश मंदिरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी चार महिलांना गौरविण्यात आले.
- यामध्ये श्रीमती सुरेखा शेवाळे टाले, श्रीमती शितल ससे, श्रीमती निर्मला पतंगे,श्रीमती चिकटे,मंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच थोर नेत्यांच्या,समाजसुधारक यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. प्रबोधनपर ईतर कार्यक्रम राबविले जातात.
गुणीजनांचा गौरव केल्या जातो.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक श्री. पंढरीनाथ बुधवंत, केंद्रप्रमुख के.सी.घुगे यांनी मार्गदर्शन केले.
श्रीमती सुरेखा शेवाळे टाले, शितल ससे यांनी सत्काराला उत्तर दिले.
यावेळी श्री. प्रकाश ससे, श्री. भगवान डोईफोडे, श्री. गीते काका तसेच कार्यक्रमास महिला श्रीमती बुधवंत ताई, श्रीमती सांगळे ताई, श्रीमती ननेर ताई, श्रीमती अग्रवाल ताई, श्रीमती लहाने ताई तसेच महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सुरेखा शेवाळे टाले, शीतल ससे यांनी देशातील कर्तत्वान महिलांच्या गौरव गाथेवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.