राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मोहिमे सह जिल्हा स्तरीय मेंदूज्वर लसीकरणाचे उद्घाटन

जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)
आज दि 1 मार्च 2025 रोजी जिल्हास्तरीय मेंदू ज्वर लसीकरण मोहीम कार्यक्रम आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम 2.0 या मोहिमेचे उदघाटन मा. राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते जिंतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालया मध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते,जिंतूर तहसीलदार सरवदे सह भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे हे उपस्थित होते.
या वेळी डॉ रविकिरण चांडगे वैद्यकीय अधीक्षक ग्रामिण रुग्णालय जिंतूर, डॉ. दिनेश बोराळकर तालुका आरोग्य अधिकारी जिंतूर व ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथील सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच आरबीएसके डॉ.प्रशांत बामणे, डॉ गौतम,विनोद राठोड,अनिल सावंत, देशमुख,लांडगे,प्रधान,राठोड सिस्टर, anm व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.राहुल गीते यांनी मांडली तसेच डॉ. नागेश लखमावार यांनी मेंदूज्वर लसीकरण व राष्ट्रीय बाल स्वास्थ या कार्यक्रम विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या मोहिमेचे उद्घाटन करत सदरील कार्यक्रमात आरोग्य व्यवस्था उंचावण्यासाठी मोलाचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले तसेच मोहिमेचे उदघाटन केले.