भाजपमध्ये प्रवेशाचा वाढतोय ओघ जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार
*जि.प.अध्यक्ष प्रसाद बुधवंत,बालाजी सांगळे सह असंख्यांचा भाजपत प्रवेश*

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)— राष्ट्रहिताची विचारधारा बाळगत व प्रगतीचा दृढ विश्वास बांधून देशात प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या भाजपमध्ये अन्य पक्ष्याच्या पादाधिकारांचा भाजप मध्ये मोठ्या प्रमानावर प्रवेश होताना दिसून येत आहे.
आज मुबंई येथे भाजप राज्य प्रभारी रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातील जि. प.अध्यक्ष प्रसाद बुधवंत, बालाजी सांगळे अनंतराव देशमुख, सरपंच गजानन कांगने,सह माजी आमदार सीताराम घनदाट,सुरेश फड,सरपंच रमेश गीते,जगन्नाथ गीते,पांडुरराव घुले,प्रा.संजय दराडे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे,माजी नगराध्यक्ष नितीन राठोड,माजी नगरसेवक नितीन राठोड,विकास सूर्यवंशी यांच्या सह माजी 10 नगरसेवकांनी सुद्धा या वेळी भाजप मध्ये जाहीर प्रवेश घेतला.या सर्वांचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या वेळी सुरेश भुमरे यांचीही उपस्थिती होती.
एकूणच आगामी प्रत्येक निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला परभणी जिल्ह्यात नक्कीच या प्रवेशामुळे मोठी ताकद भेटणार आहे. असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.