व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी भागवत चव्हाण
कार्याध्यक्षपदी सचिन रायपत्रीवार बिनविरोध निवड सचिव पदी संदीप माहूरकर यांची

जिंतूर : ५१ देशात सक्रिय असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिंतूर तालुका अध्यक्षपदी भागवत चव्हाण यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली.
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, मंचकराव देशमुख यांच्या उपस्थितीत दि. १४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी शहरातील लोकमत कार्यालय येथे बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते भागवत चव्हाण यांची पुढील दोन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भागवत चव्हाण यांच्या नावाचा प्रस्ताव दिलीप देवकर यांनी मांडला. या प्रस्तावाला व्हाईस ऑफ मीडियाच्या नोंदणीकृत पत्रकारांनी एकमताने मंजुरी दिली. तालुका कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्षपदी सचिन रायपत्रीवार, सचिव संदीप माहूरकर, सहसचिव रामकिशन ठोंबरे, उपाध्यक्ष दिलीप देवकर, राजू गारकर, प्रशांत मुळी व शंकर जाधव, कोषाध्यक्ष राम रेघाटे, सह- कोषाध्यक्ष राजाभाऊ काळे, कार्यवाहक गुलाबराव शिंदे, संघटक पदी संतोष तायडे, राहुल वाव्हळे, बाळू दाभाडे, सदस्य पदी पद्माकर कौशिडीकर, नितीन भंगाळे, नितीन रोकडे, रामप्रसाद दराडे, दत्ता तुरनर ,आबासाहेब जाधव, दिलीप माघाडे, चंद्रकांत गवळी, अतुल जगताप व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेभाऊ नगरकर, मंचकराव देशमुख, नेमिनाथ जैन, प्रवीण मुळी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया च्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.