Uncategorized

वडिलोपार्जित संपत्तीच्या विकासासाठी मुलाचा आईसह आत्मदहनाचा इशारा

निवेदन देऊनही जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प

वडिलोपार्जित हक्का साठी तरुणाचा आईसह आत्मदहनाचा इशारा

दुसरे लग्न करून बाप सुखात

जिल्हा प्रशासना सह पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प

वडीला सह प्रशासनाचीही सावत्र वागवणूक

जिंतूर–कायद्या नुसार माझ्या आईला वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा भेटावा या एकमेव न्याय मागणी साठी तालुक्यातील एका तरुणाने चक्क स्थानिक प्रशासनास आत्मदहनाचा लेखी इशारा देवूनही पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाने चुप्पी साधलेली सध्या तरी दिसून येत आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील असोला (कवडा) येथील दत्ता सूर्यभान घुगे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनात आपली दुःखद कैफियतेत असे स्पष्ट केले की त्याची आई कमल सूर्यभान घुगेचा विवाह 50 वर्षा पूर्वी सूर्यभान रामभाऊ घुगे यांच्या सोबत हिंदू रितिरिवाजा प्रमाणे झाला होता.
माझ्या आईला तीन अपत्ये झाली.त्यात दोन मोठ्या बहिणी व मी पण काही कालावधी नंतर माझ्या वडिलांने आईच्या सहमिती शिवाय दुसरी स्त्रीस घरी आणले.
व त्या स्त्रीस सुद्धा तीन अपत्य झाली.एक मुलगी आणि दोन मुले आहेत.बेकायदेशीरपणे ज्या स्त्रीला घरात आणल्यावर वडिलांनी व त्या घरात आणलेल्या स्त्री कडून माझ्या आईला छळण्यास सुरवात झाली.जेवण न देता घरातील व शेतातील सर्व कामे आईवर लादली जात असे आईने जेवण हाताने घेतल्यास मारहाण सुद्धा होत होती.
आईच्या दुखण्याला दवाखाना सुद्धा नव्हता.
मी 8 ते 9 वर्षांचा असताना मला हिमोफेलिया नावाचा आजार झाला.विलाजासाठी मी एक महिना छत्रपती संभाजीनगरला होतो.पण दुर्दैवाने वडील मला स्वतःचे मूल म्हणून पाहण्यास सुद्धा आले नाही.
माझे मोठे भावजी त्यांची ऐपत नसतांना माणुसकी जपत त्यांनी माझ्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च केला.पुढे मी घरी आल्यास मला घरात येण्यास मनाई केली.परिणामी मी घरापाठी मागील पत्राच्या घरात कसेबसे दिवस काढले.
आणि आता मामाच्या गावाला आलो. सध्या मी जिंतूर तालुक्यातील पिपरी (खुर्द) येथे नाविलाजास्तव राहतो.विशेष म्हणजे वडीलास 30 ते 32 एकर शेती आहे.शेतीचा बहुतांश भाग सावत्र आई व सावत्र भाऊ यांचे नावे आहे.सध्या माझ्या आईचे व माझे जीवन हालाखीची असुन मी स्वतः कशीबशी रोजनदारी करून माझा व आईचा उदरनिर्वाह भागवत आहे.
हक्काच्या बापाणेच दुर्लक्ष केल्याने मी तब्बल 13 वर्षा पासून घर चालवतो व मामाच्या जुन्या घरात राहतो. नियमानुसार संपत्तीची वाटणी करण्याची वडीलास दाद पण मागली होती.पण बापाने नकार दिल्याने परिणामी न्यायालयात दाद मागितली आहे.सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
दुःखद बाब म्हणजे मी माझ्या न्याय हक्का साठी केस केली म्हणून माझें मोठे भावजी,बहीण,आई व मला सावत्र आई व सावत्र भावा कडून मला त्रास होत आहे.मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत.परीणामी आमच्या जीवितास धोका सुद्धा निर्माण झालेला आहे.
दि.08/12/024 रोजी मोठे भावजी व बहीण असोला येथे गेले असता त्यांच्या सोबत भांडणे केली गेली.दुःखद बाब म्हणजे बहीणीचे लग्न झाले तेंव्हा पासून बहिणीला कधीच चोळीबांगडी केली नाही.
तसेच माझ्या आईला मानसिक त्रासा मुळे आईला सुद्धा मेंदूला आजार झालेला आहे.तिला नियमित उपचारासाठी हेगडेवार हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते.त्याचा महिन्याला साधारण 5000 रु खर्च येतो.
या सर्व जीवनाच्या त्रस्त व्याधी मुळे आम्हाला न्याय न भेटल्यास मला व आईला येत्या 26/02/025 रोजी आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन दत्ता सूर्यभान घुगे यांनी दिले आहे.
पण अद्याप स्थानिक प्रशासनाने घ्यावी तशी दखल घेतलेली दिसून येत नाही.

चौकट

बाम्हणी पोलीस स्टेशनची 26 फेब्रुवारी ऐवजी 26 जानेवारीलाच धावपळ

निवेदन कृत्याने आत्मदहणाचा ईशारा 26 फेब्रुवारी दिलेला असताना संबंधित पोलीस प्रशासण एक महिना अगोदरच निवेदन कर्त्यास म्हणजे दत्ता घुगेला 25 जानेवारीलाच ताब्यात घेतले. व लेखी घेऊन प्रकरण नेहमी प्रमाणे हाताळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button