Uncategorized

एसटी महामंडळ राबवनार सुरक्षितता अभियान:: पालक अधिकारी काळबांडे

एसटी महामंडळ राबवणार सुरक्षितता अभियान
-पालक अधिकारी काळबांडे

01 ते 31जानेवारी दरम्यान होणार सुरक्षितता अभियान

विविध कार्यक्रमाद्वारे वाहकांचे होणार प्रबोधन

जिंतूर:::राज्यातील सर्वसामान्य प्रवाश्यासाठी सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून एसटी महामंडळ सर्वोच्च प्राधान्य नेहमीच देत असते. एस टी महामंडळाचे चालक हे प्रशिक्षित असतात त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण असते,अवैध वाहतुकीपेक्षा एसटी महामंडळात अपघाताचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येते.
येणाऱ्या नवीन वर्षात सर्व प्रवाशांचा विना अपघात सुरक्षित प्रवास व्हावा या हेतूने येत्या नवीन वर्षाच्या एक जानेवारी ते 31 जानेवारी या एक महिन्या दरम्यान महामंडळाच्या चालकांना विविध प्रबोधन कार्यक्रमाद्वारे सुरक्षित व
विना अपघात प्रवास कसा करावा या साठी तब्बल महिनाभर एसटी महामंडळ आधारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून एसटी चालकांना मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. यासाठी सुरक्षितता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पालक अधिकारी म.म.काळबांडे तथा जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी सागितले आहे.
या अभियानादरम्यान चालकांचे सुरक्षित प्रवासा बाबत प्रबोधन करणे सुरक्षा संदर्भात नियमाचे काटेकोर पालन करणे, वाणाचा वेग नियंत्रित ठेवणे, वाहनाची तपासणी वेळोवेळी करणे सर्व वाहने सुस्थितीत ठेवणे, लेनची शिस्त पाळणे,मार्गावर विहित वेग मराठा ठेवावी चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनास ओलांडून जाऊ नये अरुंद पूलासमोर वाहन येत असल्यास आपले वाहन थांबवावे, रस्ते मोटार वाहन अपघात व सुरक्षितता या विषयाबाबत सामाजिक जनजागृती होण्याच्या हेतूने या प्रचार कालावधीत सुरक्षितता अभियाना अंतर्गत व सुरक्षितता उपाय योजनाची आवश्यकता या विषयावर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी विविध सामाजिक संस्थेची मदत घेतली जाणार आहे या कार्यक्रमांतर्गत डिजिटल माध्यमातून चालकाचे प्रबोधन व प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. वैद्यकीय तपासणी ज्यात विशेषतः दृष्टी शिक्षणाचा तपासणी आधी वैद्यकीय शिबिरे आगारात आयोजित केली जाणार आहे. या अभियाना अंतर्गत चालताना आपल्या विभागात नुकत्याच झालेल्या अपघाताची माहिती देणे तसेच सदरील अपघात कोणत्या कारणामुळे झालेला आहे व भविष्यात तो होऊ नये यासाठी आवश्यक प्रशिक्षण या अभियानात दिले जाणार आहे.
सुरक्षितता अभियानातच नव्हे तर सदैव काळजी घेण्याची आव्हान या प्रशिक्षण कालावधीत चालकाना दिले जानार आहे. वाहनांची तपासणी नेहमी अत्यंत काटेकोरपणे करणे तसेच आगर प्रमुख,वाहतूक,अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ज्या चालका कडून अपघात झाले आहेत अशा चालकांकडे विशेष लक्ष देणे,मानवी
चूका मुळे होणारे अपघात योग्य ती दक्षता घेतल्यास अपघात टाळता येणे शक्य असल्याबाबतच्या मुद्द्यावर या अभियानात भर देऊन त्याबाबत चालकांचे प्रबोधन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे सुरक्षित पद्धतीने वाहन चालवण्या संबंधात अनुबोधपर चित्रपट कर्मचाऱ्यांना दाखवण्यात येणार आहे.
एकूणच येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सुरक्षित प्रवासासाठी चालकांना विविध कार्यक्रमाद्वारे सुरक्षित अभियानांतर्गत प्रबोधन केले जाणार जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!