Uncategorized

भाजपचे प्रताप देशमुख विजयी::जिंतूर भाजपमय::25 पैकी 16 प्रभाग ताब्यात,राष्ट्रवादी 5 जागेवर तर काँग्रेसला 4 जागा

जिंतूरा भाजपमय:: भाजपचे प्रताप देशमुख 3267 मतांनी विजयी

प्रताप देशमुख यांना 13122 मते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबिया बेगम कपिल फारूखी यांना 9955 मते
तर काँग्रेसचे शेख इस्माईल सलीम यांना तब्बल 6292 मते
अखेर काँग्रेसच्या मत विभागणीने राष्ट्रवादी काँग्रेसला फटका
भाजप 16 जागेवर विजयी तर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त पाच जागेवर विजयी तर काँग्रेसने केला चार जागेवर ताबा
जिंतूर —-परभणी जिल्ह्यात चर्चेत असणाऱ्या जिंतूर नगरपालिकेवर अखेर भाजपने आपला निर्वाद विजय मिळवून विरोधकांना चपराक दिल्याचे दिसून आले.
25 पैकी भाजपने तब्बल 16 जागेवर आपला विजय मिळवला असून माजी विजय भांबळे यांच्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने यांना केवळ पाच जागेवरच विजय मिळवता आला.
तर काँग्रेसने मुसंडी मारत चार जागेवर विजय संपादित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या नगरपालिका निवडणूक निकालामुळे पुनश्च एक वेळ माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात लढवली ही प्रतिष्ठेची निवडणूक अखेर भाजपने सरशी केल्याचे दिसून आले आहे.
या निवडणुकीत माजी आमदार विजय भांबळे व सुरेश नागरे यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळण्याचे दिसून येत आहे.
प्रभाग निहाय घेतलेल्या मतदानाची माहिती
प्रभाग एक (अ)–
काँग्रेसच्या अहमद शमीम मौजूद यांनी 1379 मते घेऊन त्यांनी भाजपच्या अब्दुल सालेहीन बेगम खुद्दुस यांचा केवळ 184 मतांनी पराभव केला.यांना 1195 मते पडली.
प्रभाग (1ब)
यात भाजपच्या मिर्झा याहिया बेगम तैमूर बेग 1337 मते घेऊन निवडून आल्या.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेख अमन खदीर यांचा 212 मतांनी पराभव केला. त्यांना 1125 मते भेटली. तर याच प्रभागात (ऑल इंडिया मजलीस इतेहातूल मुस्लिम) चे उमेदवार ॲड शेख उस्मान अब्दुल हसन यांना 69 मते पडली.
प्रभाग (2अ)
यात काँग्रेसच्या श्रीमती हुसेनाबी शेख मेहमूद या 1155 मते घेऊन विजयी झाल्या.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुरेशी मरियम यांचा केवळ 135 मतांनी पराभव केला.त्यांना 1020 मते भेटली.
या प्रभागात भाजपच्या कुरेशी सोमय्या परवीन दाऊद यांना केवळ 158 मते भेटले.

प्रभाग (2 ब)
या प्रभागात काँग्रेसचे शेख इस्माईल सलीम हे विजय झाले. त्यांनी 1151 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पठाण शौकत खान बरकत खान यांचा 112 मतांनी पराभव केला. त्यांना 1039 मते पडली.
तर भाजपचे सय्यद नसीर सय्यद खबीर यांना केवळ 144 मते पडली.

प्रभाग 3 (अ)
या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या समरीननिसा अल्ताफ हे विजयी झाले असून त्यांना 1636 मते पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुरेशी शेख साबीर शेख सलीम यांचा 891 मतांनी पराभव केला.त्यांना 845 मते पडली.
तर काँग्रेसच्या रजियाबी जबार खान यांना 497 मध्ये पडली.
प्रभाग तीन ब
या प्रभागात भारतीय जनता पार्टीचे श्रीमती देशमुख सोनाली कल्याणराव ही विजयी झाल्या असून त्यांना 1657 मते पडली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद मेहेर बानू खय्युम यांचा 868 मतांनी पराभव केला.त्यांना 747 मते पडली.
तर काँग्रेसच्या चाऊस रेहाना बेगम सईद यांना 574 मते पडली.
ऑल इंडिया मजलिस इतेहादूल मुस्लिमीन यांना 47 मते पडली.

प्रभाग चार (अ)
या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती पठाण हुमा आफरीन शेहजाद खान या 1439 मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पठाण समरीनबी हकीम खान यांचा 496 मतांनी पराभव केला.त्यांना 953 मते पडली.
प्रभाग चार (ब)
प्रभाग चार मध्ये भाजपचे योगेश रेणुकादास काशीकर हे 1384 मते घेऊन विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणेकर नागनाथ लहानू आप्पा यांचा 607 पराभव केला.त्यांना 777 मते पडली. तर काँग्रेसचे देशपांडे चंद्रकांत विश्वनाथ यांना 162 मते पडली तर ऑल इंडिया मजलीस इतेहादूल मुस्लिम मिन गटाचे पठाण नईम खान यासीन खान यांना 100 मते पडली.
प्रभाग 5(अ)
या प्रभागात काँग्रेसच्या श्रीमती पठाण सीमा परवीन वसीम खान या 1591 मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख नसरीन यासीन यांचा 582 मतांनी पराभव केला. त्यांना 1008 मते पडली.
तर भाजपच्या शेख फरहाणा बेगम शेख रहमान यांना केवळ 491 मध्ये पडले.
प्रभाग पाच ब
प्रभाग पाच मध्ये काँग्रेसचे मोहम्मद माज मोहम्मद हकीम हे 1582 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मिर्झा शाहिद बेग नूर बेग यांचा 536 मतांनी पराभव केला.त्यांना 1046 मते पडली. तर भाजपचे सोहेल अहमद अब्दुल कादीर यांना 548 मध्ये पडली.
प्रभाग 6 अ
या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती लकडे पूजा संदीप आप्पा या 1085 मते घेऊन विजयी झाल्या.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोईफोडे कल्पना मनोहर यांचा 94 मतांनी पराभव केला. त्यांना 991 मते पडली.
प्रभाग 6 ब
या प्रतिष्ठेच्या समजणाऱ्या प्रभागात भाजपच्या चव्हाण प्रगती प्रदीप या 1015 मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विजय भांबळे यांचे पुतणे पृथ्वीराज प्रमोद भांबळे यांचा केवळ 149 मतांनी पराभव केला. त्यांना 966 मते पडली.
प्रभाग सात मध्ये भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती चौधरी प्रदीप या 1433 मध्ये घेऊन निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोकडे मथुराबाई दत्तराव यांचा 697 मतांनी पराभव केला.
तर काँग्रेसच्या नवसागर छाया प्रकाश यांना 361 मते पडली.
प्रभाग सात ब
या प्रभागात भाजपचे एडवोकेट गोपाळ नागोराव रोकडे हे 1484 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे दत्तात्रय तान्हाजीराव यांचा 798 मतांनी पराभव केला.
तर काँग्रेसचे सय्यद अफरोज फेरोज यांना 363 मध्ये पडली.
प्रभाग आठ अ
या प्रभागात भारतीय जनता पार्टीचे कटारे दत्तात्रय भगवानराव हे 1117 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कटारे अरविंद हरिभाऊ यांचा 78 मतांनी पराभव केला.
प्रभाग आठ ब
या प्रभागात भारतीय जनता पार्टीचे श्रीमती कुरेशी सुलतानबी शेख नईमुद्दीन या 1105 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खान नजरजान नामदारखान यांचा केवळ चार मतांनी पराभव केला.
तर अपक्ष जयबुनीचा बेगम शेख पाशा यांना 45 मध्ये पडले.
प्रभाग 9 अ
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती उबाळे अशामती रामराव 1365 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मयुरी शामराव सूर्यवंशी यांचा तब्बल 732 मतांनी पराभव केला. तर काँग्रेसच्या
घनसावत प्रिया अनिल यांना 299 मते पडले.
प्रभाग 9 ब
या प्रभागात राष्ट्र वादी काँग्रेसचे सय्यद जुबेर सय्यद शिकुर हे 1296 मते घेऊन विजयी झाले.त्यांनी भारतीय जनता पार्टीचे शेख अलीम अब्दुल रौफ यांचा तब्बल 565 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार शेख आसिफ शेख मुजीब यांना 293 मते पडली.
प्रभाग 10
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंड अशोक उमाकांत हे 1338 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपचे प्रतीक प्रभाकर घनसावत यांचा 41 मतांनी पराभव केला.त्यांना 1197 मते पडली. काँग्रेसचे केशवे धम्मपाल उत्तम यांना 43 मते पडली.
प्रभाग 10 ब
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती भांबळे महानंदा नामदेव या 1476 मते घेऊन विजयी झाला त्यांनी भारतीय जनता पार्टीचे देशमुख विमलबाई बळवंतराव यांचा पराभव 396 मतांनी केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या टाले सुरेखा लक्ष्मीकांत यांना 42 मते पडली.
प्रभाग 11 अ
प्रभाग 11 अ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती राठोड जयश्री राजेश ह्या तब्बल 14455 मते घेऊन एकतर्फी विजयी झाल्या.त्यांनी राष्ट्रवादीच्या शेंद्रे प्रतिभा दीपक यांचा 1067 मतांनी पराभव केला.त्यांना केवळ 388 मते पडली तर अपक्ष कल्याण शितल जगदीश यांना 154 मते पडली. पवार रेखा संजय यांना 67 मते पडले.
प्रभाग 11ब
प्रभाग 11ब मध्ये भाजपच्या श्रीमती जाधव अंतिका हरिश्चंद्र यांनी या गटात रेकॉर्ड ब्रेक 1553 मता घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागरे संगीता सुरेश यांचा 1079 मतांनी दणदणीत पराभव केला.त्यांना केवळ 474 मते पडली.
प्रभाग 11 क
काही काळापूर्ती स्थगित झालेल्या प्रभाग 11 क मध्ये भाजपचे गोरे सचिन भुजंगराव यांनी 1454 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे घुगे अरुण आसाराम यांचा 1004 मतांनी पराभव केला.त्यांना 550 मते पडली.

प्रभाग 12 अ
या प्रभागात भाजपचे शेख अथर शेख नूर एक 1043 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख अहमद बागवान यांचा 203 मतांनी पराभव केला. राष्ट्रीय काँग्रेसचे बुधवंत श्रीहर श्रीपतराव यांनी 281 मते घेतली.
प्रभाग 12 ब
या प्रभागात भारतीय जनता पार्टीचा श्रीमती पठाण मेहेमुनिसा फाय ह्या 1025 मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्दिकी मोहमदी निजामुद्दीन यांचा 153 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे खान नाजेमा आयुब यांनी 266 मते घेतली.
चौकट
एकूणच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप जिंतूर तालुक्यातून पिछाडीवर असताना आता पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत नगरपालिकेवर एकतर्फी ताबा मिळवल्याने येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळताना दिसून येत आहे.
भाजपने प्रचंड बहुमत मिळवल्याने शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर,नवनिर्वाचित अध्यक्ष प्रताप देशमुख,सचिन गोरे,गोविंद थिटे, नानासाहेब राऊत, विलास भंडारे,सुनील भोंबे गोविंद दायमा व नवनिर्वाचित नगरसेवकांची विजय मिरवणुकीमध्ये उपस्थिती होती.
प्रचारादरम्यान दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता केली जाईल असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर शहरवासीयांना आश्वासित केले.
विजय मिरवणुकी दरम्यान पुष्पा चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग “झुकेंगा नहीं साला” हे हावभाव पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी करून दाखवल्यानंतर उपस्थित जनसमुदायात उत्साह शिगेला पोहोचल्याचे विजय मिरवणुकीत दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!