Uncategorized

राष्ट्रवादीला मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत :: उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रवादीला मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत-उपमुख्यमंत्री अजित पवार
अल्पसंख्याक मतविभागणी करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा

अजित पवारांच्या सभेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराना बळकटी

सबीया बेगम यांनी शहरात हिंदू मंदिर उभारण्यास दिले प्राधान्य– मा.आ.विजय भांबळे

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही- सुरेश नागरे

जिंतूर —राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीच विकासात राजकारणात न करता फक्त विकास केलेला आहे. आमच्या हाती सत्ता द्या विकास झाला निधी मी कमी पडू देणार नाही. शहराचा विकास कसा असतो हे आपण बारामतीकडे पाहिल्यास समजेल शहरातील दादा शरीफ चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपालिका निवडणुका निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या सभेस शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला दिसून आला.
अजित पवार यांनी असेही आपल्या भाषणात पुढे सांगितले की दिवंगत कपिल फारूखी नेहमी काम घेऊन येत असेल असा उजाळा दिला. आम्ही सर्व समाजाला डोळ्यापुढे ठेवून विकास पूर्णत्वाकडे नेतो असे स्पष्ट केले. सर्वधर्मसमभाव सेक्युलर भावना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती असल्याचे सांगितले.
सध्या आपल्याकडे दाखल होत असलेल्या एकतर्फी खोट्या केसेस असे भविष्यात होता कामा नये. आदर्श आचारसंहिता ही सर्वांसाठी सारखी असावी असा अंगुली निर्देश स्थानिक प्रशासनास केला.मी शब्दाचा पक्का आहे मी शब्द कधी फिरवत नाही. राजेश विटेकरला शब्द दिला होता आमदार करेल मी करून दाखवलं निशब्द फिरवत नाही. अल्पसंख्यांक इद्रिस यांना आमदार केले.
आपली अल्पसंख्यांक एकजूट दाखवा सबिया भाभीच्या मत विभागणीसाठी जो तिसरा उभा आहे त्याचे डिपॉझिट जप्त करा असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून केले. शेवटी राष्ट्रवादी पक्षांच्या पंचवीस नगरसेवकांना व नगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबीया भाभीना भक्कम साथ देत जिंतूर शहरांच्या सर्वांगीण विकास साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

मा.आ.विजय भांबळे यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात स्थानिक नगरपालिकेची सत्ता होती त्यावेळी शहरातील सर्वांगीण विकास केल्याचे भांबळे यांनी नमूद केले. स्वच्छ पाणी शहरातील अंतर्गत रस्ते नाल्या,दिवाबत्ती शहराच्या सुंदरतेत भर टाकणारी मार्गावरील हॅलोजन लाईट, सबीया भाभी यांनी कुठेही हिंदू मुस्लिम ही भावना मनात न ठेवता हिंदूंची 15 मंदिरे शहरात बांधली.

दलित बांधवांसाठी चांगल्या दर्जाचे बौद्ध विहार बांधण्यात आले.यावरून सांगावे लागेल. भविष्यात पुन्हा शादी खाना व सर्वसामान्य नागरिकांसाठी एक भव्य मंगल कार्यालय तसेच सांस्कृतिक भवन आदी विकास करण्याचा मनोदय विजय भांबळे यांनी व्यक्त केला. कारण सध्या शहरात असलेले खाजगी मंगल कार्यालयास दीड ते दोन लाख रुपये असे फीस घेतात. जो सर्वसामान्य मुलीचे आई-वडील देऊ शकत नाही. ही खंत भांबळे यांनी व्यक्त केली. निवडणुका आल्या की आश्वासनाला व पैशाला बळी न पडता विकासाला मत द्या असे विजय भांबळे यांनी मत व्यक्त केले. सुरेश नागरे व मी वेगवेगळे विधानसभेला उभे होतो. आम्ही एकत्र असतो तर चित्र वेगळे असते कारण आमच्या दोघांच्या मतांची संख्या एक लाख 81 हजार आहे. हिंदूंना मते मागणाऱ्यांनी या पूर्वी हिंदूचीच सात दुकाने पाडून त्यांना रस्त्यावर आणले. एका मुस्लिम बांधवांचे सामान सुद्धा बाहेर काढू न देता त्याचेही दुकान पाडले. हे विकासाचे राजकारण आहे का असा प्रति प्रश्न विजय भांबळे यांनी विरोधकांना केला.
शेवटी अध्यक्षपदाचे दावेदार बाळासाहेब भांबळे यांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचे भरसभेत कौतुक सुद्धा केले.
अध्यक्षपदाच्या उमेदवार सबीया बेगम कपिल फारूखी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेला विकास कामांची माहिती सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले व आपल्या भाषणात भाषण करताना गहिवरून आल्याचे दिसून आले.

सुरेश नागरे यांनीही आपल्या भाषणात राष्ट्रवादीला सत्ता द्या राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार विकास निधीची कमतरता पडू देणार नाही असे आपल्या भाषणात सांगितले. शहरातील अपेक्षित विकास पूर्णत्वाकडे नेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असा आशावाद सुरेश नागरे यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांनी आपल्या शहरातील दौऱ्या दरम्यान सुरेश नागरे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांचे औक्षण अम्रता नागरे यांनी केले.या वेळी सुरेश नागरे लक्ष्मण बुधवंत, प्रेक्षा भांबळे संतोष आंधळे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!