Uncategorized

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन:राज्य सरचिटणीस किशन कुंड

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्रम शाळा शिक्षक/शिक्षकेतकर कर्मचाऱ्याचे एक दिवसाचे वेतन:राज्य सरचिटणीस किशन पुंड

जिंतूर — ढग फुटी सदृश्य पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी एक दिवसाची वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची माहिती महाराष्ट्र संघटनेचे सरचिटणीस किशन पुंड यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे.
या वर्षीच्या पावसाने सबंध महाराष्ट्रात हाहाकार उडालेला असून महाराष्ट्रातील विशेषता मराठवाडा व विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. ढगफुटी सदस्य पावसाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
आता तोंडाशी आलेले पीक ज्यात नगदी पीक कापूस, हळदे सह तुर या पिकांचे पावसाने अतोनात नुकसान झाले असून हजारो हेक्टर शेतीतील पिके नष्ट झाल्याचे विदारक चित्र सध्या मराठवाडा व विदर्भात जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
कर्ज काढून घाम गाळून शेतीची पेरणी करून उभारलेली पूर्ण पिके संतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पिके पार नष्ट झाली असून संबध राज्यभरातून नुकसानग्रस्त बळीराजा कडून महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून मागणी केली आहे.
राजकीय विरोधी पक्षाने सुद्धा राज्यशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रु आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
राजकीय सत्ताधारी व विरोधी राजकीय लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्या साठी आर्थिक मदती साठी मुख्यमंत्री सहायता आपले वेतन देण्याची उदारतारता दाखवलेली आहे.
त्याच प्रमाणे महाराष्ट्र आश्रम शाळेतील शिक्षक: शिक्षेतर संघटनेचे सरचिटणीस किशनराव कुंड यांनीही आपतग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे जाहीर केले आहे.
त्याबद्दलचे लेखी निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सह इतर मागास बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे,तसेच इतर मागास बहुजन कल्याण खात्याचे सचिव आदींना आर्थिक मदती बाबतचे लेखी निवेदन देऊन कळवले आहे.
आर्थिक मदतीसाठी सत्ताधारी विरोधी लोकप्रतिनिधी सह महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुढे सरसावली असली तरी राज्यातील सर्वात मोठी असलेली शासकीय कर्मचारी,अधिकारी वर्ग संघटना अद्याप आर्थिक मदतीसाठी पुढे आलेली दिसून येत नाही. या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!