पितृ पक्षात अन्नदान उपक्रम: एचएआरसी संस्थेचा सामाजिक उपक्रम

एचएआरसी संस्थेचा
पितृपक्षात ‘अन्नदान उपक्रम’
@एचएआरसी संस्थेचा सामाजिक उपक्रम
@जिल्ह्यातील 15 निराधार महिलांना अन्नदान साहित्य वाटप
जिंतूर– दि 07 सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील चांदज, पांगरी, भिलज, भोगाव देवी, वस्सा , बेलखेडा, वरूड नृसिंह, शेवडी येथे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या टीम ने वैयक्तिक पातळीवर भेट देऊन तालुक्यातील निवडक 7 निराधार विधवा ताईच्या कुटुंबास 1 महिना पुरेल इतका जीवनावश्यक किराणा साहित्य देऊन पितृपक्षात एक प्रकारे ‘अन्नदान’ केले करून मदत केली.
भविष्यात उदरनिर्वाहासाठी साधन देऊन निराधार ताईला स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करण्याचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.
त्यांना आज महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक किट देण्यात आले. या जीवनावश्यक वस्तूंच्या अन्नधान्य किराणा साहित्य मध्ये गहू, तांदूळ, तुवर डाळ, चना डाळ, मसूर डाळ, मूग डाळ , साखर, सोयाबीन तेल, चटपट मसाला, विक्रम चहा, रवा, मैदा, पोहा, मुरमुरा, मीठ ,शेंगदाणे, शाबुधाना, हळद, मिरची ,मोहरी,जीरा, व्हील साबण, काडी पुडा, लाईफबॉय साबण, व्हील साबण इत्यादी साहित्य समावेश होता.
*लोकसहभागातून उपक्रम*: एचएआरसी संस्थेने सोशल मिडियावर मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी डॉ लीना बागडिया, रविकुमार मौर्य, प्रा किशन चोपडे, प्रेमा मुंदडा, बद्रीविशाल सोनी यांनी मदत केली.
आज जिंतूर तालुक्यातील उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, उपाध्यक्ष डॉ शैलेश मंत्री, समन्वयक प्रकाश डूबे, संतोष बारबिंडे , प्राचार्य कैलास मुटकुळे, सुनीता मगर मॅडम, उबाळे सर उपस्थित होते.