Uncategorized
केशवराव बुधवंत यांच्या निवास्थानी श्री ची जल्लोषात प्रतिष्ठापणा

जिंतूर—-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचे हर्षल्हासात स्वागत करण्यात आले असून शहरी सह ग्रामीण भागात सुद्धा आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना आनंदाने शहराच्या ग्रामीण भागाच्या घरोघरी श्रीची प्रतिष्ठापणा केलेली दिसून आली.
लहानथोरा सह बालगोपलानी गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात धोलताशाच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.
तालुक्यातील पांगरी या गावी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.मीनाताई केशवराव बुधवंत यांनीही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या निवासस्थानी बाप्पाची एक वेगळ्या प्रकारे आकर्षक अशी सजावट करून श्रीची मोठ्या भक्तिभावे प्रतिष्ठापना केली.
याही वर्षीही त्यांनी बाप्पांची सुंदर देखणी मूर्ती व आकर्षक सजावट करून आपल्या निवासस्थानी गणरायाची आकर्षक मूर्तीची स्थापना केल्याचे दिसून आले.