बनावट खात्यावरून बदनामी प्रकरणी आरोपीस कडक शासन करा–वंजारी समाज बांधवांची मागणी

जिंतूरात वंजारी समाजाचा मूक मोर्चा
बनावट खात्यावरून बदनामीप्रकरणी कठोर कार्यवाही करा–वंजारी समाजाची मागणी
मूक मोर्चा काढून केला जाहीर निषेध
जिंतूर—राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून वंजारी समाजाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ जिंतूर येथे वंजारी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
जिंतूर तालुक्यातील पृथ्वी भांबळे याने विष्णू नागरे या बनावट नावाने फेसबुकवर खाते उघडून दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आणि राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी करणार्या पोस्ट प्रसारित केल्या. या प्रकाराचा निषेध करत जिंतूर शहरातील भगवान बाबा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी लक्ष्मण इलग, प्रसादराव बुधवंत, डॉ. पंडितराव दराडे, माधव दराडे, रामप्रसाद घुले, शिवाजी काळे, भानुदास घुगे, वाल्मिक टाक, सुयोग मुंडे, कासाबाई बुधवंत, अशोक बुधवंत, संदीप घुगे, पुरुषोत्तम घुगे, रामराव घुगे, रवी घुगे, वैष्णवी कुलकर्णी, शोभा पावडे, चांगुबाई सांगळे, विष्णू सातव, देवराव घुगे, संतोष पालवे, प्रवीण कांदे आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी मोर्चेकर्यांनी स्थानिक प्रशासनास निवेदन दिले. या वेळी ना.तहसीलदार राखे व पोलीस निरीक्षक सरोदे यांची उपस्थिती होती. त्याद्वारे, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पुढे अशा घटना घडल्यास वंजारी समाज रस्त्यावर उतरेल,असा इशाराही देण्यात आला आहे.
—————————————————————-
संबंधित आरोपीने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला असून तमाम वंजारी समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अश्या घटना या पुढे खपवून घेतल्या जाणार नाही.अशा घटना घडल्यास तमाम वंजारी समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल व यास सर्वस्वी जवाबदार प्रशासन राहील.
——–लक्ष्मण ईलग
——————————————————————
तालुक्यातील तमाम वंजारी समाज सर्व समाज बाधवाशी गुण्यागोविंदाने राहतो.कुठल्याही समाजाशी तेढ निर्माण करत आलेला नाही.हा इतिहास आहे.पण आरोपीने समाजाची नाहक बदनामी करण्याचा केविलवाणी प्रयत्न केला असून आरोपीस कठोर शासन झाले पाहिजे. वंजारी समाज नेहमी बोर्डीकर परिवाराच्या पाठीशी नेहमी राहत आलेला आहे.व पुढेही निश्चितच राहणार ——-माधव दराडे