Uncategorized

पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या “विष्णू नागरे” वर गुन्हा दाखल करा:भाजप पदाधिकारी आक्रमक

पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या विरुद्ध समाज माध्यमावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा.

भाजप पदअधिकाऱ्याचे पोलीस ठाण्यात निवेदन.

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–परभणी जिल्हाच्या पालकमंत्री सौ मेघना दिदि बोर्डीकर यांच्या विरुद्ध शोशल मिडीयावर वारवार जिंतूर येथील विष्णु नागरे हा सतत त्यांचा फेसबुक अकांऊट वरून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्हाच्या पालकमंत्री मा.ना.सौ मेघना दिदि साकोरे बोर्डीकर यांच्या बद्दल अपमानास्पद व बदनामीकारक तसेच आक्षेपार्ह पोष्ट करीत असतो .
त्याने केलेली पोष्ट ही फेसबुक व इतर समाज माध्यमावंर उपलब्ध आहे असे चुकीचे व बिनबुडाचे खोटे संदेश पसरवनारा विष्णू नागरे या व्यक्तीवर आय टी सेल कायद्या अर्तगत गुन्हा दाखल करून त्वरीत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी म्हणून जिंतूर येथील भारतीय जनता पक्षाचे पदअधिकारी यांनी पोलीस स्टेशन जिंतूर येथे आज दिनांक २८ जुलै सोमवारी निवेदन दिले आहे.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, खेत्रे आबा, बाबाराव आंधळे, एड सुनिल मते, शिवाजी कदम, गोपाळ रोकडे,संदीप घुगे, शिवाजी काळे, शेख मतीन तांबोळी, सुयोग ज्ञानोबा मुंढे, दत्ता काळे,भाकरे गणेश, भास्कर थिटे, अशोक बुधवंत, सचिन आडे, दत्ता कटारे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या केल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!