
जिंतूर तालुक्यात हळद लागवड जोमात
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–तालुक्यात पाऊस हळद लागवडीस समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद प्राधान्य देऊन लागवड जोमाने करत आहेत.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यातच अवकाळीच्या रूपाने का होईना पाऊस समाधानकारक झाला. त्यामुळे जमिनीची मशागत यांत्रिकपद्धतीने करून जमीन पेरणी योग्य केली.
या वर्षी बहुतांशी शेतकरी वर्ग हळद लागवडी साठी पुढे आलेला दिसून येत आहे.
तालुक्यातील बलसा शिवरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने हळदीचे बेड ओढून त्यावर फुल्ली मारून मजुराच्या साह्याने लागवड केली तर काही शेतकऱ्यांनी टॅक्टरवरच पेरणीची सोय असलेले टॅक्टरचा उपयोग करून हळदीची लागवड केली आहे. सगळीकडे मशागतीची कामे सुरु झाल्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे ही शेतकरी राजा अडचणीत आला आहे हें मात्र तेवढेच खरे आहे.
अवकाळी पावसाने नदी,नाले खळखळून वाहू लागले असून पशुना चाऱ्या पाण्याची सोय झालेली आहे.