Uncategorized

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमाची मेजवानी:फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच व गोर बंजारा समाज बांधवांचा उपक्रम

 

जिंतूर (:गुणीरत्न वाकोडे)–महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव निमित्ताने शहरातील फुले शाहू आंबेडकर विचार मंच व गोर बंजारा समाज बांधवांच्या वतीने दि. ९ एप्रिल बुधवार रोजी स्वरादर्श संगीत रजनी या कार्यक्रमाचे
आयोजन केले आहे.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्ताने शहरातील फुले शाहू आंबेडकर विचार मंच व गोरबंजारा समाजाच्या वतीने दि.९ एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी ६:०० वा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा, नगरपरिषद जिंतूर कार्यालयासमोर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे शिष्य गायक संतोष चव्हाण प्रस्तुत स्वरादर्श संगीत रजनी गायक संतोष चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आणि संच गायिका पंचशील बनकर, कांचन धनराज, मयुरी जाधव, कथा नृत्यांगना कुमारी लावण्या बनसोडे यांचा बुद्ध वंदनावर कथक नृत्य, भीम गीतावर नृत्य, शास्त्रीय नृत्यासह समाज प्रबोधन पर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक भाई केदार (ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष)

कार्यक्रमाचे उद्घाटक लक्ष्मण बुधवंत संस्थापक अध्यक्ष संत संत भगवान बाबा युवा संघटना महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जयंती उत्सव समितीचे सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संजय आढे, फुले शाहू आंबेडकर विचार मंच जिंतूर व गोर बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button