Uncategorized

नंदकुमार गादेवार यांची अ.भा. श्री वासवी पेनिगुंडा ट्रस्च्या विश्वस्त पदावर निवड

 

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–
आर्य वैश्य महासभेचे राहय अध्यक्ष तथा उदयोगपती
श्री नंदकुमार गादेवार यांची नुकतीच पेनिगुंडा येथील मूळ अ.भा. श्री वासवी पेनिगुंडा ट्रस्ट च्या विश्वस्थ पदावर बिनविरोध निवड झाली आहे
आर्य वैश्य समाजभुषण समाजकार्या विषयी तीव्र तळमळ असलेले,
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आर्य वैश्य महासभाचे संस्थापक अध्यक्ष,श्री काशी अन्नपूर्णा आर्य वैश्य वृद्धाश्रम आणि नित्यान्नसत्रमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष,महाराष्ट्र आर्य वैश्य महासभाचे अध्यक्ष,श्री संत साधु महाराज संस्थानचे उपाध्यक्ष मा.श्री नंदकुमारजी गादेवार यांची श्री राम नवमी च्या शुभदिनी कोमटी समाजाची आर्य वैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी मातेचे जन्मस्थान असलेल्या पेनुगोंडा येथील अखिल भारतीय वासवीमाता ट्रस्टच्या विश्वस्थ म्हणून प्रथम महाराष्ट्र राज्यातून बिनविरोध निवड झाली असुन मा.नंदकुमाजी गादेवार हे महाराष्ट्रातील आपल्या समाज बांधवापैकी नियुक्त झालेले पहिले सदस्य होण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे.आपली नियुक्ती समस्त आर्य वैश्य समाज बांधवांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद अशी आहे. आपल्या गरुडभरारी बद्दल सर्वत्र त्यांचे खुप अभिनंदन होत आहे आणि भावी विशेष सेवा कार्यासाठी भरभरुन हार्दिक शुभेच्छा जिंतूर मधून त्यांचे या निवडी बद्दल जिंतूर येथील आर्य वैश्य कोमटी समाज बांधवांनी अभिनंदन केले असून अध्यक्ष सखाराम चिद्रवार, किरण वट्टमवार, मुकुंद कोकडवार, प्रदीप कोकडवार, सुनिल वट्टमवार,सचिन रायपत्रीवार आदिनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दिल्या जात आहेत या पुढे हीं त्यांच्या हस्ते राज्यतील च नव्हे तर भारत देशात समाज संघटन मजबूत करण्यासाठी मोठं योगदान ठरणार आहे.
तिरुपती येथे महासभेचे भक्त निवास लातूर येथे मंगल कार्यालय समाजातील गरजवन्ताचा स्तर उंचावणे आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचार यावर मजबुतीने पालटून लावणे असे मोठे कार्य घडणार आहेत या साठी स्वतः गादेवार नेहमी प्रयत्नशील असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button