
जिंतुर–( गुणीरत्न वाकोडे)
मुस्लिम समाजात सर्वात पवित्र रमजान महिना असून येथील मोहम्मद मौजम ॲड युनुसमिया देशमुख चारठाणकर यांचा मुलगा मोहम्मद ऊजेर देशमुख वय नऊ वर्ष या चिमुकल्याने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा पूर्ण केला
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून उन्हाची तीव्रता वाढली आहे.
मुस्लिम समाजात सर्वात पवित्र असलेला रमजान महिनात दिवसभर अन्न व पाण्याचा पूर्णपणे त्याग करून उपवास म्हणजे रोजा ठेवला जातो. मोहम्मद ऊजेर देशमुख यांनी आपल्या आयुष्याचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल फुलगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वडील मोहम्मद मौजम देशमुख चारठाणकर, काका मोहम्मद मुजफ्फर देशमुख, अड. तारेख देशमुख, मोहम्मद मुन्नवर देशमुख मामा जाहिद सिद्दीकी, नाना मोहम्मद अली पटेल, भाई रियान देशमुख,आजी, आई व परिवारांनी कौतुक व अभिनंदन केले.