पालकमंत्री मेघना बोर्डीकराना भोगाव (देवी) च्या ग्रामस्थांचे उर्दू शाळेच्या नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी
ग्रामस्थांनी दिले पालकमंत्र्यास निवेदन

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)
तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावीत अशी मागणी पालकांच्या वतीने राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी यांना एका कार्यक्रमात निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील आठवीपर्यंतच वर्ग सुरू असल्याने पुढील शिक्षणासाठी मुले व मुलींना तालुक्यांच्या ठिकाणी जावे लागत असल्याने सदरील नववी व दहावीचे उर्दू वर्ग सुरू करण्याची मागणी राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर या भोगाव देवी येथे आल्या होत्या त्यावेळी पालकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले व उर्दू शाळेतील 106 विद्यार्थी असल्याचे निवेदनात म्हटले असून गावातच पुढील नववी व दहावीची शिक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जमील कुरेशी, भगवान देशमुख, गजानन देशमुख, हाकीम कुरेशी, मुस्तकीम कुरेशी, फिरोज शेख, मोशीन बेग, सय्यद करीम सय्यद उमर, आदी पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.