अखेर कृष्णा शिवाजीराव देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणार प्रवेश!!!
आ.राजेश विटेकर,सुरेश नागरेंच्या नेत्रत्वात काम करणार--कृष्णा देशमुख

@ 28 फेब्रुवारीला परभणीत होणार शक्ती प्रदर्शन करत प्रवेश
@ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भेटणार तालुक्यात बळ
जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे) तालुक्यातील भोगाव (देवी) येथील दिवंगत शिवाजीराव मोरे यांचे सुपुत्र कृष्णा देशमुख यांच्या माजी मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून ते मोठे शक्ती प्रदर्शन करत परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात 28 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वा.आयोजित प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रवेश घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
तालुक्यातील भोगाव (देवी)चे राजकारण नेहमीच दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या अवतीभवती फिरलेले आजपावेतो दिसून आलेले आहे.कारण हे घराणे जिकडे तिकडेच प्रत्येक निवडणुकीत मग ती लोकसभा असो की विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तर प्रत्येक निवडणुकीत जिकडे हे देशमुख घराणे तिकडे किमान त्या गटाने त्या-त्या उमेदवास माताधिक्याच्या रूपाने ताकत-लीड दिलेली असल्याचा इतिहास आहे.
दिवंगत शिवाजीराव देशमुख यांनी ओळख शेतकरी संघटने पासून होत आलेली आहे.राज्यात देशात सत्ता त्यांची असो किंवा नसो पण शेतकऱ्यांच्या प्रश्ना साठी ते नेहमी रस्त्यावर आंदोलन करण्याचा त्यांचा पिंड सर्वश्रुत आहे.भोगाव सर्कल सह अन्य गावातील सुखदुःखात व अपघात स्थळी सर्वात अगोदर धावून जाणार व्यक्ती महत्त्व म्हणून दिवंगत शिवाजीराव देशमुख यांची ओळख सर्वपरिचित आहे. शेतकऱ्या सह सर्व जातीधर्माच्या माणसाची मजबुत फळी नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीर नेहमी उभी असायची ते म्हणजे दिवंगत शिवाजीराव देशमुख—!!!
त्यांचे सुपुत्र कृष्णा देशमुख यांच्या राजकीय इतिहासाचा आलेख चढउतार पाहता त्यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी माजी आमदार विजय भांबळे यांच्या कडे मोठे शक्ती प्रदर्शन करत भोगाव येथे प्रवेश घेतला होता.
या पूर्वी ते सध्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर,माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचेही कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होतीच पण जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा दिलेला शब्द त्यांच्या पारड्यात न पडल्याने त्यांनी विजय भांबळे कडे प्रवेश घेऊन आपली नाराजीची खंत त्यांनी स्पष्ट बोलून वेगळा मार्ग निवडला होता.
आणि शब्द पाळत इतिहासाची परंपरा कायम ठेवत गत विधानसभेला विजय भांबळे यांना 631 मताचे मताधिक्य देऊन भोगाव सर्कल वरील आपले प्राबल्य दाखवून दिले होते हे विशेष–
भेटी दरम्या स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय कारकीर्दीस त्यांनी उजाळा दिला.व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास प्रवेशा साठी कृष्णा देशमुख यांना सहमती दिली व भविष्यात नक्कीच भोगाव देवीसाठी वेळ देऊ असाही शब्द त्यांनी कृष्णा देशमुख यांना दिला तसेच त्यांनी आवर्जून सांगितले की भविष्यात पक्ष पूर्ण राजकीय ताकद आपल्या पाठीशी देईल अशी हमी दिली.
———————————————
भोगाव सर्कलने नेहमीच माताधिक्य—कृष्णा देशमुख
जिंतूर तालुक्याच्या राजकारणात भोगाव देवी हे नेहमीच राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले असून गत पंचवीस वर्षापासून आमच्या बिनविरोध भोगावची ग्रामपंचायत ताब्यात असल्याचे सांगून 2009,2019 व आत्ताची 2024 च्या निवडणुकीत कायम मताधिक्य देत असल्याचा इतिहास आहे.असे कृष्णा देशमूख यांनी सांगितले.अजितदादांचे सबंध पूर्वी पासूनच सलोख्याचे असून त्यांनी आवश्यक अश्या गावातील 2008 मध्ये 33 के.व्ही.चा अत्यंत गरजेच्या प्रश्ना साठी मागणी करताच मदत केल्याची आठवण करत उजाळा दिला भविष्यात यापुढे सुरेश नागरे आमदार राजेश भैय्या विटेकर यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात काम करणारा असून जिंतूर सेलू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी अथक परिश्रम करणार असल्याची स्पष्टोक्ती कृष्णा शिवाजीराव देशमुख यांनी दिली.