शिक्षकांची कार्यक्षमता वाढवणे ही काळाची गरज–गणेश शिंदे
शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण संपन्न!!!

शिक्षकांची क्षमता विकसित करणे काळाची गरज—-गणेश शिंदे
जिंतूर येथे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण – २.०
जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)–आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकांनी स्वतःची क्षमता विकसित करणे अत्यावश्यक आहे.असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी केले. जिंतूर येथे आयोजित “शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण – २.०” या कार्यशाळेत ते प्रमुख बोलत होते.
ही कार्यशाळा शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य वाढीसाठी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षणात शिक्षकांना नव्या पद्धतींचा अवलंब, डिजिटल साधनांचा वापर आणि विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षकांनी आपली अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी सतत नवे कौशल्य आत्मसात करावे आणि विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी शिक्षण द्यावे, असे आवाहन गणेश शिंदे यांनी केले.
आपल्या राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी निवडक विषयांवर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत करण्यात आले होते. यावर्षी उर्वरित विषयांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन करण्यात येत आहे. त्यामधून सर्व स्तरावरील शिक्षकांची क्षमता बांधणी करून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा मुख्य उद्देश आहे.
तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी पर्यवेक्षीय यंत्रणेचे सक्षमीकरण करणे महत्त्वाचे आहे. याच धर्तीवर पंचायत समिती जिंतूर अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल या ठिकाणी इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे एकूण चार टप्प्यांमध्ये या प्रशिक्षणाचे नियोजन केलेले आहे प्रत्येक टप्प्यात शाळेतील २५% शिक्षकांनी प्रशिक्षणात उपस्थित होते . प्रशिक्षणाचे जिंतूर तालुका समन्वयक प्रभाकर नालंदे यांच्या नियोजनामध्ये सुलभक जयानंद मत्रे, श्रीकांत दायमा, मयुर जोशी ,रत्नमाला तोडकर,अंबादास घाळगीर , दासा नाईक, संदिप जाकुरे, दिनकर चिलगर , पांडुरंग कोटगिरे , सचिन हजारे, विष्णू शिंदे , अनिल इघारे, अखिल यादव , रौफ शहा , रोहीत कापसे , शेषराव गायकवाड या सुलभकांनी पाच दिवस प्रशिक्षणात प्रत्येक घटकांना न्याय दिला.