Uncategorized
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी हरिहरराव देशमुख यांचे निधन
गुरुवारी दहा वाजता होणार त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार

शहरातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व शहरातील श्री सिध्देश्वर मंदीर संस्थानचे अध्यक्ष ॲड. हरिहरराव आनंदराव देशमुख (वय ९६ वर्षे) यांचे बुधवारी ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास परभणी येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. गुरुवार रोजी सकाळी जिंतूर येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यविधी दहा वाजता करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली व ॲड.विजयराव देशमुख माजी सरकारी वकील परभणी )आणि सेवानिवृत्त मेजर पंजाबराव देशमुख ही दोन मुले व , सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांचे ते काका व ॲड. संग्राम देशमुख यांचे आजोबा होत.
ॲड. हरिहरराव देशमुख यांच्या निधनामुळे हैदराबाद मुक्ती संग्रामातील जिंतूर तालुक्याने जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक गमावला आहे.