पाचव्यांदा!!! महेमुन्नीसा खान विजयी

पाचव्यांदा!!! पठाण महेमुन्नीसा फैयाज खान विजयी
शहरवासीयातून उपाध्यक्ष पदाची मागणी
हा विजय विकास कामांची पावती — टीका खान पठाण
जिंतूर —-नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवत नगराध्यक्ष पदी प्रताप देशमुख व 25 पैकी तब्बल 16 नगर सेवक भाजपचे निवडून आल्याने विरोधक चांगलेच तोंडघशी पडल्याचे चित्र समोर आले आहे.
कारण मुख्य प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय भांबळे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे केवळ पाच नगरसेवक तर नवख्या काँग्रेसने चार नगरसेवक निवडून आणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भाजपच्या प्रताप देशमुख यांना 13122 तर राष्ट्रवादी गटाच्या सबिया बेगम कपिल फारूखी यांना 9955 मते तर काँग्रेसचे इस्माईल सलीम पहेलवान यांना तब्बल 6299 मते पडली.
अख्या परभणी जिल्ह्याचे लक्ष जिंतूर नगर परिषदेच्या निवडणूक निकाला कडे लागलेले असताना पुन्हा एकवेळ माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात लढवण्यात आलेली ही निवडणूक प्रतिष्ठेची व अटीतटीची समजली गेली. पण शेवटी चाणक्य नीतीने लढवलेली माजी आमदार बोर्डीकर यांच्या मुरब्बी मार्गदर्शनात माजी आमदार विजय भांबळे व सुरेश नागरे यांना पराजाची चांगली चपराक
बसल्याचे दिसून आले.
कारण यापूर्वी नगरपालिकेवर माजी आमदार विजय भांबळे यांची एक हाती सत्ता होती. व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना शहरातून अपेक्षेपेक्षा कमी लीड होती. तरीही या नगर परिषद निवडणुकीत बोर्डीकर यांनी शहराच्या बारा प्रभागात मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देऊन आपली पकड मजबूत करत. पालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात घवघवीत यश मिळवता आले.
======================
@प्रभागातील पाचव्यांदा विजय हा केलेल्या विकास कामाची पावती@ —टीका खान पठाण
गत पाच टर्म पासून मिळालेला विजय हा केलेल्या विकास कामाची पावती असल्याचे मत नवनिर्वाचित महैमुनीसा बेगम यांचे सुपुत्र माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक तसेच सामाजिक कार्यकर्ते टीका खान यांनी पठाण व्यक्त केले.
प्रभागातील वेळोवेळी असलेला दांडगा संपर्क प्रभगासह शहरात केलेली विकास कामे,तहसील, पंचायत समिती,नगरपालिका,पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणच्या नागरिकांच्या कामासाठी तत्परतेने पुढाकार असतो.
त्यांनी तब्बल पाच कोटी 78 लाख रुपयाचा विकास निधी आणून त्यांच्या प्रभागा मध्ये अडीच कोटींचे विविध विकास कामे केली.
व उर्वरित विकास निधीतून शहरांच्या विविध भागात आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट रस्ते व नाल्याची कामे, पथ दिवे,करून मतदारांचे लक्ष वेधले होते.
त्यांचे बंधू बासुखा पठाण व मोहसीन खान पठाण यांनीही वेळोवेळी प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत सतत संपर्क ठेवत असतात.
नुकत्याच पार झालेल्या या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 12 (ब)मधून त्यांनी तब्बल 1025 मते घेऊन पाचव्यांदा विजय संपादित केला.परिणामी शहरवासीयातून त्यांची उपाध्यक्ष पदाची मागणी जोर धरत आहे.



