Uncategorized

अखेर माजी नगरसेवक पठाण मज्जिद खान यांचा भाजपत प्रवेश

सुरेश नागरे यांना निवडणुकीतच दिली सोडचिठ्ठी

अखेर माजी नगरसेक पठाण मज्जिद खा यांचा भाजपत प्रवेश

सुरेश नागरेना निवडणुकीतच यांना सोडचिठ्ठी
प्रभाग चार मध्ये भाजपला बळकटी भेटणार

जिंतूर —सुरेश नागरे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक पठाण मज्जिद खा साहेब व निवडणूक रिंगणात इच्छुक असलेले त्यांचे सुपुत्र पठाण वसीम खान मस्जिद खान यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरेश नागरे यांच्याकडून उमेदवारी न भेटल्याने नाराजी व्यक्त करत चक्क निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश घेऊन प्रभाग चार मध्ये भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार प्रताप देशमुख व उभे असलेले दोन भाजप नगरसेवकांना प्रभाग चार मधून
भरघोस मतांनी निवडून आणण्याचे अभिवचन पठाण मजीद खा यांनी दिले.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात माऊली मंगलकार्यालयात संपन्न झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रवेशा दरम्यान बोलताना त्यांनी जगजाहीर केले.
एकूणच माजी नगरसेवक पठाण मज्जिद खा व त्यांचे सुपुत्र वसीम यांच्या भाजप प्रवेशाने प्रभाग चार मध्ये भाजपला भक्कम मजबुती नक्कीच भेटणार असे चित्र स्पष्ट होताना दिसून येत आहे.
या प्रवेशादरम्यान अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख ओबीसी नेते नानासाहेब राऊत माझी जि.प.सदस्य प्रसाद बुधवंत व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या प्रमाणात या कार्यकर्ता बैठकीत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!