आता विद्यार्थीही एसटीचा लाडका:: प्रवासादरम्यान 50 टक्के सूट विद्यार्थ्यांना भेटणार::आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण

आता विद्यार्थीही एसटीचा लाडका
सुट्टयात एसटीची 50 टक्के घसघशीत सूट
सुट्टीत गावी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी प्रवास फायदेशीर ठरणार
विद्यार्थांनी सुट्टीत एसटीच्या 50 टक्के सवलतीचा फायदा घ्यावा — आगार व्यवस्थापक चव्हाण
जिंतूर –एमएसआरटीसी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलत क्रमांक चार अंतर्गत विशेष सवलत देत असे जाहीर केले आहे की या सवलत क्रमांक चार योजनेनुसार बाहेरगावी शिकणाऱ्या शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या या उपलब्ध सुट्ट्यांमध्ये आपल्या पाल्यांना,नातेवाईकांना भेटण्यासाठी कॉलेज व शाळेपासून मूळ गावा पर्यंत व मूळ गावापासून शाळा कॉलेजपर्यंत जाण्यासाठी तिकीट दरात घसघशीत 50 टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी दिली आहे.
जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही सवलत अत्यंत फायदेशीर ठरू शकते या सवलतीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आलेले आहे या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जात असलेल्या सवलत क्रमांक चार अंतर्गत शहरातील प्राचार्य,प्राध्यापक मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून या सवलती बद्दल सविस्तर असे मार्गदर्शक आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान विशद केले आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती कागदपत्रे द्यावी अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी आहे याचीही माहिती भेटी दरम्यान त्यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी शहरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की आपल्या पाल्यांना भेटण्यासाठी एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या 50% सवलतीचा नक्की लाभ घ्यावा आणि आपली आर्थिक बचत करावी असेही आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.




