कौसडी सर्कल मध्ये 50 कोटीचा भ्रष्टाचार: प.स.सदस्य अर्जुन वजीर यांचा आरोप

कौसडी सर्कल मध्ये झालेल्या 50 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा••प.स. सदस्य अर्जुन वजीर
इडी चौकशीची केली मागणी
जिंतूर —-तालुक्यातील भोसडी सर्कल मध्ये झालेल्या विविध विकास कामात 50 कोटीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप व तसे लेखी निवेदन माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन वजीर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की अर्जुन वजीर यांनी दिलेल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की कोसडी सर्कल मध्ये 17 गावे येतात.
या पाच वर्षापासून या सर्कलमध्ये कार्यरत असलेले अभियंता कैलास उत्तमराव देशमुख यांच्याकडे चार्ज असून पाच वर्षात खासदार फंड असेल आमदार फंड असेल असे 15/25 ची कामे असो की
एसआरएफ असो अन्य कोणताही निधी असो या गावांमधील जेवढे कामे मंजूर झालेले आहेत ते फक्त कागदावरच असून गावामध्ये एकही काम केलेले कुठेच दिसून येत नाही.
असा धक्कादायक आरोप अर्जुन वजीर यांनी अजियंता देशमुख यांच्यावर केला आहे.
त्यांनी असेही नमूद केली आहे की संबंधित अभियंता देशमुख हे फक्त पैसे घेतात पण कोणाचेही काम करत नाहीत. एखाद्या गुत्तेदाराने काम केले तर त्याला बिल सुद्धा देत नाहीत. 20 टक्के कमिशनची मागणी हे वेळोवेळी करत असतात.तालुक्यातील गणपुर येथे तब्बल 90 लाखाची कामे मंजूर झाली पण ती कामे फक्त कागदावरच झाली.
कोणत्याही ठिकाणी काम झालेले दिसून येत नाही.
व जी कामे केली ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची व इस्टिमेट प्रमाणे कोणते काम झालेले नाही एका लहान गावांमध्ये 90 लाखाची कामे झालेली असेल तर पावसाळी सर्कल मध्ये येणाऱ्या 17 गावांमध्ये 50 कोटीची कामे बोगस झाल्याचा आरोप त्यांनी लेखी नियोजनात केलेला आहे.
सर्व गावांमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून गावात नाल्या सीसी रोड नसल्याने गावामध्ये चिखल झालेला दिसून येत आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या कामासाठी अभियंता दुसरा असल्यामुळे ती कामे पूर्ण झाली आहेत.
पण ज्यावेळी अवांतर फंड अभियंता यांच्या हातावर झालेली आहेत ती कामे बोगस आहेत.
विकासकामा साठी प्राप्त 50 कोटी रु.मधील भ्रष्टाचार करून दहा कोटी रुपये स्वतः त्यांनी हडप करण्याचा आरोप अर्जुन वजीर यांनी लेखी निवेदनात केलेला आहे.
संबंधित सतरा गावांमध्ये फक्त जी कामे झाली ती थातुर मातुर व निकृष्ट दर्जाची झाली असून काही कामे कागदावर दाखवून प्रचंड भ्रष्टाचार या अभियंता महोदयांनी केल्याचा आरोप केला आहे.
तेव्हा एक उच्चस्तरीय चौकशी पथक नेमून सर्व झालेल्या कामाची चौकशी करावी व त्यांना बेडतर्फ करावे अशी मागणी अर्जुन वजीर यांनी केलेली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी,विभागीय आयुक्त तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी आपल्या स्वाक्षरी निशी दिलेले आहे.



