सरपंच पावर्तीबाई हरकळचा 15 ऑगष्टला दिल्लीत होणार यथोचित सन्मान

सरपंच पावर्तीबाई हरकळचा आज होणार राजधानीत सन्मान
जिंतूर तालुक्यातील कुंभारी गावाच्या विकास कामाचा डंका दिल्लीत
गावाच्या सर्वांगीण केलेल्या विकास कामाची भेटली पावती
जिंतूर— तालुक्यातील कुंभारी गावच्या सरपंच पावर ती बाई हरकळ यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विकास कामाची दखल घेत आज त्यांचा देशाच्या राजधानीत यथोचित सन्मान केला जाणार आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील कुंभारी या गावातील महिला सरपंच पावरतीबाई हरकळ यांनी गावात लोकसहभागातून गावातील आवश्यक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, गावातील चौफेर सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविणे वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवणे पेव्हर ब्लॉक बसवणे, गावात आवश्यक असे शौचालयाचे शंभर टक्के उद्दिष्ट काल मर्यादित पूर्ण करणे,स्मशानभूमीवर शेड उभारून सदर ठिकाणी रस्त्याचे काम करणे, जिल्हा परिषद शाळेत पाणीपुरवठा, शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, महिला सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत गावात तब्बल 13 महिला बचत गट उभे करून या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना गृह उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे व त्यांना स्वावलंबी बनवून आर्थिल विकास साधण्यास महत्वाचे कार्य पार पाडणे, वृक्षारोपण मोहीम यशस्वीपणे राबवणे, या सर्व विकासात्मक कार्याची दखल घेत कुंभारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वामी समर्थ केंद्र परभणी यांच्या मार्फत कृषी महोत्सव अंतर्गत 2025-26 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तालुक्यातील कुंभारी गावात वेळोवेळी विकासात्मक कामाची दखल घेत गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार सुद्धा केला होता.
या सर्व गावपातळीवर उल्लेखनीय सर्व विकासात्मक कामाचा डंका देशाची राजधानी दिल्ली येथे पोहचला व आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी कुंभारी गावच्या सरपंच पावरती बाई हरकळ यांचा यथोचित सन्मान होणार आहे.