शिवराम लाटे यांना दीपस्तंभचा आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान

शिवराम लाटे यांना दीपस्तंभचा आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान
जिंतूर–जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगी तांडा केंद्र केहाळ ता. जिंतूर, जि. परभणी येथील प्राथमिक शिक्षक शिवराम उर्फ शिवाजी सोपानराव लाटे यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्याबद्दल आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान प्रदान करण्यात आला.
हा सन्मान रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी परभणी येथे राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर,मा. इंद्र मणी (कुलगुरु, वसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी) तसेच वृत्तनिवेदक विलास बडे (News18 लोकमत) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिक्षक शिवराम लाटे यांनी आपल्या शाळेत १०० टक्के विद्यार्थी पटनोंदणी करण्यासाठी , १०० टक्के उपस्थिती टिकविण्यासाठी आधुनिक तञज्ञानासह शालेय व सहशालेय उपक्रम याचा प्रभावीपणे वापर केला नवोदय व शिष्यवृत्ती सारख्या परिक्षेस विद्यार्थी प्रवेश पाञ बनविले.उत्कृष्ट बि.एल. ओ. म्हणून काम केले. बौद्धाचार्य म्हणून जवळपास साडेसातशे मुला मुलीचे विवाह विधी मोफत पार पाडून व्यसनमुक्ती आणि अधश्रद्धा निर्मुलनासाठी खेड्यापाड्यात प्रबोधन करत आहेत.
त्याच्या या शैक्षणिक आणि सामजिक कार्याची दखल घेऊन दीपस्तभ प्रतिष्ठानच्या वतिने त्याचा उपक्रमशील शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सर्व स्तरावरून त्याचे अभिनदन करण्यात येत आहे.