पतीनेच पत्नीचा केला निर्गुण खून:छाती-पोटावर केले 12 वार

सोनापूर तांडा येथे विवाहितेचा निर्घृण खून
खुना पूर्वी “बायकोला भावपूर्ण श्रद्धांजली” असे पतीने ठेवले स्टेट्स
पतीनेच पत्नीच्या छाती-पोटावर केले अमानुष 12 वार
जिंतूर—तालुक्यातील सोनापूर तांडा येथील एका विवाहितेचा तिच्याच पतीने सोनापूर शेतशिवारात तीक्ष्ण हत्याराने तब्बल 12 वार करत निर्घृण हत्याकांड केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी की आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सोनापूर तांडा येथे विवाहित महिला आपल्या माहेरी आलेली होती.गावाच्या शेतशिवारात सदरील महिला थांबली असता तालुक्यातील वाघी येथील रहिवाशी विजय राठोड याने अमानुषपणे तब्बल आपल्याच पत्नीच्या जिच्या सोबत 8 ते 10 वर्षा पूर्वी विवाह झाला होता.त्याच पत्नीच्या पोटा-छातीवर तीक्ष्ण हत्याराने तब्बल 12 वार करत निर्घृणपणे खून केला.
या अचानक झालेल्या जबर हल्ल्यात दुर्दैवी विद्या राठोडचा जागमोक्यावर मृत्यू झाला.ही घटना घडल्या नंतर सदरील मयत महिलेचे पार्थिव शहराच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथे नातेवकांचा एकच आक्रोश होता.
मयत महिलेस दोन अपत्य असून आज तर आईविना पोरके झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पतीपत्नीत काही कारणास्तव भांडणे झाली होती असे समजते.भांडणे झाल्या मुळे पत्नी जवळच माहेर असलेल्या सोनापूर तांडा येथे आली होती. ततद्नंतर पतीने आपल्या स्वतःच्या मोबाईलवर खून करण्यापूर्वी बायकोस भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेट्स ठेवले होते अशीही माहिती मिळते.
हे वृत्त लिहेपर्यत पोलीसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.आरोपी पती फरार असल्याचे समजते चारठाना पोलीस पुढील तपास करत आहे.