Uncategorized

मागासवर्गीययांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आक्रोश आंदोलन-दलित पँथर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणदादा भुतकरांचा इशारा

दलित पँथरच्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करा—प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणदादा भूतकर

दलित पँथरने 26 व्या वर्धापन दिनी घेतलेल्या 27 ठरावाची शासनाकडे मागणी

जिंतूर—-राज्यात दलितांच्या मागण्या संदर्भात आक्रमक व निर्णायक आंदोलन छेढणारी संघटना म्हणून दलित पँथर संघटनेची राज्यात ओळख आहे.

आज तहसीलदार जिंतूर यांना दलित पँथरच्या 26 व्या वर्धापन दिनी विविध 27 मागण्यांचे ठराव सर्वानमते घेण्यात येऊन सदरील मागण्याचे निवेदन दलित पँथर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणदादा भूतकर यांच्या व असंख्य पँथर कार्यकृत्ये व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
सदरील लेखी ठरावात छत्रपती संभाजी नगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा,अतिक्रम हटाव मोहिमेत संभाजी नगर येथील मागासवर्गीय वस्ती मधील पाडलेल्या घरमालकास रमाई घरकुल योजनेतून तत्काळ घरे बांधून देण्यात यावे,मुस्लिम समाजास शैक्षणिक,सामाजिक राजकीय आरक्षण द्यावे,मराठा समाजास स्वतंत्र कायदा तयार करून आरक्षण जाहीर करावे,छत्रपती संभाजी नगरच्या चिखलठाना विमानतळास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,बोरी येथील गट क्र.187, धम्म परिषदेच्या बाजूला गत 40 वर्षा पासून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना रमाई घरकुल योजनेतून घरकुल बांधून द्यावे,राज्यातील गायरान धारक कसणाऱ्या गायराणधारकांचे 7/12 तत्काळ त्यांच्या नावे करावे,विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज तत्काळ माफ करून नवीन कर्ज देणे सुरू करून एन.एस.एफ.डि.सी.कर्ज पाच लाखा पर्यतची वाढ करावी,

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी व राज्यातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांना तात्काळ दहा लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात यावे,40 वर्ष वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तात्काळ तयार कार्ड वाटप करण्यात यावी, रमाई घरकुल योजनेचे अनुदान पाच लाख रुपये पर्यंत वाढवावे, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रिक मीडियाच्या संरक्षण कायद्याची राज्यात कडक अमंलबजावणी करावी, दलित पॅंथरच्या दलित चळवळीत काम केलेल्या ज्येष्ठांना तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार जाहीर करण्यात यावे, राज्यातील महिला बचत गटांना वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्यात यावे,

नुकताच मंत्रिमंडळात पारित केलेला जन सुरक्षा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, सबंध राज्यात ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,संजय गांधी व अन्य योजनेचे मानधन वाढवावे,राज्यातील मागासवर्गीय वरील होणारे अन्याय थांबवण्यासाठी शासनाने स्वतंत्र फोर्स ( मागासवर्गीय सुरक्षा बल) स्थापन करावे आदी विविध मागण्या निवेदनात नमूद आहेत.

निवेदनात पँथर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणदादा भूतकर,ऍड.धम्मपाल दांडगे,गौतम इंगोले,ऍड.प्रकाश सोनवने,अमोल भूतकर, खंडेराव साळवे,यशोदाबाई वाकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या वेळी लक्ष्मणदादा भूतकर यांनी शासनकर्त्यांनी जोरदार चौफेर टीकास्त्र सोडत मागासवर्गीयांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!