केशवराव बुधवंत यांच्या निवासस्थानी श्री.ची प्रतिस्थापना
जिंतूर— सबंध जिंतूर तालुक्यात श्री गणरायाचे मोठ्या हर्षउल्हासात स्वागत करण्यात आले असून शहरासह ग्रामीण भागात आपल्या गणरायाच्या प्रतिस्थापणे साठी लहानमोठ्या सह बालगोपालांनी श्रीच्या मूर्तीचे वाजत-गाजत स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात सादर करण्यासाठी जो-तो रममाण झालेला दिसून आला. तालुक्यातील पांगरी येथे केशवराव अर्जुनराव बुधवंत यांनीही आपल्या निवासस्थानी सुंदर आकृष्णक सजावटीत श्रीची प्रतिस्थापना मोठ्या हर्षुउल्हासात केली.या वेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. मीनाताई बुधवंत यांची उपस्थिती होती.
या वर्षी राज्यासह देशात वरूनराजा चांगला बरसला.तालुक्यातील येलदरी धरण तुडुंब भरले पिण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.
येलदरी धरणाच्या शंभर टक्के भल्यामुळे परभणी,हिंगोली सह नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. लवकरच येलदरीच्या धरणातून वीज तयार होण्याची शक्यता असून या वीज उत्पन्नातुन शासनास कोठ्यावधीचा महसूल प्राप्त होतो.समाधान कारक बरसलेल्या पावसामुळे जमेची बाजू आहे.