भाजप अल्पसंख्याक परभणी जिल्हाध्यक्षपदी मतीन तांबोळीची फेरनिवड

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी मतीन तांबोळी यांची फेरनिवड.
जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)–भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण ची जिल्हा कार्यकारिणी परभणी येथे दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी पालकमंत्री नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर व मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी जाहीर केली आहे.
जिल्हा कार्यकारिणीत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा परभणी (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी मतीन तांबोळी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर व मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचे अत्यंत विश्वासू तसेच अल्पसंख्यांक समाजातील सुशिक्षित, शांत संयमी, अभ्यासु, व बोर्डीकर परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पक्षांमध्ये त्यांची ओळख आहे.
यापूर्वी देखील मतीन तांबोळी यांनी अल्पसंख्यांक मोर्चा परभणी ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष म्हणुन यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळलेली आहे. मागील कार्यकाळातील पक्षातील त्यांचे योगदान, पक्ष कार्यात सक्रिय सहभाग, त्यांची निष्ठा, समर्पण, संगठन कौशल्य आणी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग लक्षात घेता पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर व जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी परत एकदा त्यांना संघटनात्मक महत्वाच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्ष पदी संधी दिली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी करण्यात आली आहे.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा परभणी ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष पदी मतीन तांबोळी यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर, मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सभापती गंगाधर बोर्डीकर,वसंतराव शिंदे,मा.नगराध्यक्ष सचिन गोरे, मा.नगराध्यक्ष प्रताप देशमुख, महामंत्री डॉ.पंडित दराडे, शशिकांत दादा देशपांडे,तालुकाध्यक्ष गोविंद थिटे,भाजप अनु जा./ज.ता.अध्यक्ष विजय वाकळे, मा.नगरसेवक चंद्रकांत बहिरट,विलास भंडारे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.