मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवसानिमित्त रक्तदान शिबीर:पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची उपस्थिती
@ झरी येथे रक्तदानास उस्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
@ पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची उपस्थिती
@रक्तदानास झरी येथे उस्फूर्त प्रतिसाद
परभणी–(गुणीरत्न वाकोडे)
तालुकास्तरावरचे रक्तदान शिबिर झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिंतूर चे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण , झरीचे सरपंच दिलीपराव देशमुख, डॉ प्रमोद देशमुख आदींची उपस्थिती होती, या शिबिरास रक्तदात्यांनी भरगोस प्रतिसाद देऊन 104 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रियंका अंभोरे ,डॉक्टर नूतन देशमुख ,कुलकर्णी , गायकवाड, मोरे, दिनेश बिरगड ,नारायण जगाडे ,अडकिने मॅडम, बोबडे मॅडम ,केंद्र मॅडम तसेच न्यू लाइफ ब्लड बँकेतर्फे पंकज खेडकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष दैवत लाटे, सखा पाटील ,गजानन जगाडे , ओंकार देशमुख, भास्कर जगाडे ,संतोष देशमुख ,अनिल सावंत ,प्रशांत देशमुख, कैलास रगडे ,गौतम ढाले, समीर खतीब ,डी एम जगाडे ,दत्ता चौधरी,विष्णू पारदे, उत्तमराव देवडे ,लक्ष्मण चट्टे ,गणेश बल्लाळ, दत्ता जगाडे ,पंढरी बारहाते ,रमेशराव तरवटे, अनंतराव भोजने आदींची उपस्थिती होती.