सुरेखा टालेंचा शहर समस्या बाबत पुढाकार
मुख्याधिकारी दंडवते सह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

सुरेखा टालेंचा शहर समस्येसाठी पुढाकार
@ सुरेखा टाले,मुन्ना टालेंची पालिकेच्या सीओ समवेत प्रदीर्घ सकारात्मक चर्चा
@ पिण्याचे दूषित पाणी,अनधिकृत फ्लेक्स,बॅनर,अतिक्रमण, दिव्यांग कल्याणकारी योजना आदींवर चर्चा
जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)—-सामाजिक कार्या साठी नेहमीच हिरारीने पुढाकार घेणारे दापंत्य–मुन्ना टाले व त्यांच्या सुविद्य पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा टाले यांनी शहरातील विविध समस्यां सोडवण्यासाठी नुकतीच नगर परिषदेत नव्याने रुजू झालेले कर्त्यव्यदक्ष पालिका मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत चर्चेदरम्यान शहर शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि अतिक्रमणासंदर्भात कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, फ्लेक्स नियमबाह्य लावणाऱ्यांवर कारवाई करून संबंधित व्यावसायिकांची दुकाने बंद करण्याचा इशारा मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे.
या संदर्भात बुधवारी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत टाले व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा संघटक सुरेखा शेवाळे टाले यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहरातील पिण्याच्या दूषित पाण्याचा प्रश्न, अनधिकृत फ्लेक्स-बॅनर, अतिक्रमण, दिव्यांग कल्याण अशा महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. मुख्याधिकारी दंडवते यांनी सांगितले की, पिण्याचे पाणी सुरक्षित असून रंगात बदल झाला असला तरी ते पिण्यास योग्यच आहे.
——————————————
@दिव्यांग, युवकांसाठी योजनांची अंमलबजावणी बाबत चर्चा
——————————————
चर्चेत दिव्यांग नागरिकांसाठी योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात यावा, तसेच तरुणांना व्यसनमुक्तीसाठी प्रेरणा देण्याचे उपक्रम हाती घेण्याचा संकल्प या चर्चेत करण्यात आला. या चर्चेत सुरेखा शेवाळे, मुन्ना टाले, गुलाब साबळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
टाक्यांची पाहणी करून लवकरच सुधारणा केली जाईल. तसेच,भाजी मंडई आणि मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन सुरू असून, पदपथ व्यापाऱ्यांची दुसरीकडे व्यवस्था केली जाईल. शहरातील विनापरवाना फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्जबाबत मुख्याधिकारी दंडवते यांनी स्पष्ट इशारा दिला की, नियमबाह्य फ्लेक्स लावल्यास संबंधित व्यावसायिकांचे दुकान सील करण्यात येईल. परवानगीशिवाय जाहिराती लावणे बेकायदेशीर आहे. ही कायदेशीर भूमिका मुख्याधिकारी यांनी मांडली.
एकूणच शहराच्या विविध समस्येबाबत सुरेखा टाले यांनी मुख्याधिकारी दंडवते यांच्या समवेत सकारात्मक चर्चा कडून आणली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.