
जिंतूर तालुक्यात हळद लागवड जोमात
जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)-तालुक्यात पाऊस हळद लागवडीस समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद प्राधान्य देऊन लागवड जोमाने करत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यातच पाऊस समाधानकारक झाला. त्यामुळे जमिनीची मशागत यांत्रिकपद्धतीने करून जमीन पेरणी योग्य केली. हळद लागवड केली.तालुक्यातील बलसा शिवरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने हळदीचे बेड ओढून त्यावर फुल्ली मारून मजुराच्या साह्याने लागवड केली तर काही शेतकऱ्यांनी टॅक्टरवरच पेरणीची सोय असलेले टॅक्टरचा उपयोग करून हळदीची लागवड केली आहे.
सगळीकडे मशागतीची कामे सुरु झाल्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे ही शेतकरी राजा अडचणीत आला आहे.
हे वास्तव चित्र पुढे आलेले दिसून येत आहे.
नेटचा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला असून मेच्या पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जिंतूर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरले असून तालुक्यातील मराठवाड्यात नंबर दोनचे मातीचे मोठे धरण म्हणून प्रसिद्ध असलेले एलदरी धणात सुद्धा पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने धरणा पाणीसाठयात
पावसाळ्यापूर्वीच मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाला तर येलदरी धरण सुद्धा शंभर टक्के भरण्याच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत.