विश्वजीत शिंदे दहावीत चमकला:96.20 टक्क्यांची उत्तुंग भरारी
इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम व संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुणाची झेप

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–शहरातील विद्या व्हॅली इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी विश्वजित बालाजी शिंदे याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 96.20 टक्के गुण मिळवत तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे विशेष म्हणजे, संस्कृत या विषयात त्याने 100 पैकी 100 गुण मिळवून शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले.
आहे.अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यश मिळवले आहे. विश्वजितच्या या यशामुळे कुटुंबात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या शिंदे कुटुंबासाठी हे यश अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.शाळेचा प्राचार्या,शिक्षकवर्ग,पालक आणि मित्रपरिवाराकडून विश्वजितवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्याचे हे यश आगामी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विद्या व्हॅली शाळेच्या प्राचार्या प्रिया देशमुख यांनी व्यक्त केला आहे.