Uncategorized

पुंगळा येथे अखंड हरिनाम सप्ताह

जिंतूर -(गुणीरत्न वाकोडे)–तालुक्यातील पुंगळा दिनांक 6 मे मंगळवार रोजी आरंभ अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन श्री पिंगलेशवर महादेव मंदिर येथे करण्यात आले आहे .सांगता दिनांक 13 मे मंगळवार रोजी होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह मध्ये श्रीमद् भागवताचार्य ह. भ .प .गिरीश महाराज मुळी रामपुरीकर यांच्या मधुर वाणीतून होणार आहे .
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी चार ते सहा काकडा भजन ,. सात ते दहा तुकोबाराय गाथा पारायण. ,11 ते 12 गाथा भजन. ,बारा ते चार श्रीमद् भागवत कथा. सायंकाळी सहा ते सात हरिपाठ .रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन व नंतर हरीजागर होत आहे .सप्ताहामध्ये दिनांक 8 मे गुरुवार रोजी ह भ प सचिन महाराज लावणीकर, दिनांक 9 मे शुक्रवार रोजी ह भ प भगवान महाराज इसातकर ,दिनांक 10 मे शनिवार रोजी ह भ प नंदकिशोर महाराज घनसावंगीकर, दिनांक 11 मे रविवार रोजी श्री 1008 आचार्य स्वामी राघवचैतन्यजी संस्थान रूढी, दिनांक 12 मे सोमवार रोजी ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर यांचे कीर्तन होणार आहेत.
दिनांक 13 मे 2025 मंगळवार रोजी सकाळी आठ ते दहा भागवत ग्रंथाची शोभायात्रा, व अकरा ते एक श्री. ह भ प प्रसाद महाराज गडदे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसाद होईल. तरी पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पुंगळा यांच्या वतीने करण्यात आले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button