मालेगाव तांडा येथे उन्हाळी सुट्टीत कलेशी गट्टी
कौशल्य शाळे संबंधी एचएआरसी संस्थेचा उपक्रमात

जिंतूर–( गुणीरत्न वाकोडे)–
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) परभणी आयोजित उन्हाळ्याची सुट्टीत कलेशी गट्टी या कौशल्य कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव तांडा येथे आज दिनांक 16 मे 2025 रोजी करण्यात आले होते ज्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक श्री काळे, कार्यशाळेचे प्रवर्तक पांडुरंग पाटणकर, सहशिक्षिका श्रीमती स्वामी मॅडम, उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी कार्यक्रमाचे विभागीय समन्वयक श्री प्रकाश दुबे सर, श्री राठोड सर आदी उपस्थित होते.
तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर सरांनी कागद काम ज्यामध्ये कागदाच्या विविध टोप्या, कागदी गॉगल्स, विविध माध्यम प्रिंट आणि टाळ्या चे प्रकार व कृतीयुक्त गीतांतून बालकांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांनी तल्लीन होऊन कृतीशील सहभाग नोंदविला. चिरंजीव ऋषिकेश याने कार्यशाळे विषय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीमती स्वामी मॅडम यांनी केली. तर आभार श्री काळे सरांनी मांडले. यशस्वीतेसाठी श्री राठोड सर व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक व डॉ शिवा आयथळ समन्वयक सॅम (स्तुडेंट असोशिएशन इन मायक्रोबायोलॉजी) ज्ञानोपासक कॉलेज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी स्टुडन्ट असोसिएशन इन मायक्रो बायोलॉजी ज्ञानोपासक कॉलेज परभणी येथील विद्यार्थ्यांनी शाळेला कला व शैक्षणिक साहित्य किट भेट दिली.
*सॅम ज्ञानोपासक कॉलेज तर्फे कला कौशल्य किट:-* सॅम (स्तुडेंट असोसिएशन इन मायक्रोबायोलॉजी) , ज्ञानोपासक कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी या वंचित मुलांना दिलेल्या किट मध्ये
चित्रकला वही, स्केचपेन बॉक्स, वॉटर कलर बॉक्स, ऑइल पेस्टल बॉक्स,
रंगीत पेपर, लीड पेन, बॉल पेन इत्यादी वस्तूंचा समावेश होता.