Uncategorized

हज यात्री करूंचा प्रत्यक्ष घरी जाऊन सत्कार संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचा)पुढाकार

जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे)–सौदी अरेबिया येथील मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का मदीना हज यात्रेसाठी जिंतूर तालुक्यातील मुस्लिम बांधव जात आहेत त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते सुरेश भैया नागरे यांच्या मार्गदर्शनात हज यात्रेसाठी जाणारे-शेख मकसूद शेखलाल (जिंतूर),इरशाद खान शब्बीर खान (जिंतूर),शेख रशीद शेख करीम (जिंतूर),शेख नजीर शेख बशीर (जिंतूर),शेख जावेद शेख अहमद (जिंतूर) खैसर मिया देशमुख ( चारठाणा ),सय्यद नईम सय्यद अमीन (जिंतूर),सय्यद जमील सय्यद रोशन (जिंतूर),सय्यद रौफ सय्यद पाशा (जिंतूर),सय्यद हाफिज सय्यद जुबेर (जिंतूर),शेख इसराइल शेख गफूर (जिंतूर),इरफान गुल मोहम्मद वाईया (जिंतूर),आदी हज यात्रेकरूंचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला.
जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हज यात्रेकरू यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आपल्या भारत देशात सुख,समृद्धी,शांतता राहावी व तसेच जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी हज यात्रेकरूंनी प्रार्थना करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूर च्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी नानासाहेब राऊत ज्येष्ठ नेते रा.कॉ. जिंतूर, लक्ष्मणराव बुधवंत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अविनाशराव काळे मा. जिल्हा परिषद सदस्य, राजेंद्रजी नागरे मा.जिल्हा परिषद सदस्य, संतोषराव आंधळे माजी नगरसेवक, उस्मान खान पठाण माजी नगरसेवक, जाबेर मुल्ला अंशल लाला, तहसीन देशमुख माजी उपसरपंच चारठाणा, युवराज घनसावत, आमीन लाखानी आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button