
जिंतूर -(गुणीरत्न वाकोडे)
-शहरातील श्री राम मंदिर (कसबा पेठ) येथे श्री रामनवमी निमित्त मंदिर समितीच्या वतीने ” श्री राम जन्मोत्सव ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी जिंतूर शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम जन्मोत्सव
यानिमित्त श्रीरामाचा पाळणा गाऊन महिलांनी रामजन्मोत्सव साजरा करून गुलाल उधळत श्रीरामाची जन्म साजरा करण्यात आला.लगेच श्री रामाची महाआरती करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, राहुल देशमुख, मनोज साळवे, माऊली देशमुख , बाळासाहेब देशमुख,कल्याण देशमुख, संग्राम देशमुख, रवी देशमुख, केदार सोनी, गणेश खवणेे ,गिरीश जोशी, दत्ता महाराज, आदींची उपस्थिती होती.
यांच्या सह यावेळी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान सायंकाळी ५ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून ‘भव्य पालखी व झाकी मिरवणूक काढून जय श्रीराम घोषणा करत पालखी मिरवणूक श्री राम मंदिर पासून मुख्य रस्त्या वरून पुन्हा श्रीराम मंदिरात पर्यंत काढण्यात आली.जयश्रीराम घोषणेने शहर दुमदुमले.
दुसऱ्या दिवशी 07 एप्रिल रोजी दुपारी ‘ १ ते ५ ‘ या वेळेत ‘महाप्रसादाचे आयोजन ‘ करण्यात आले आहे. तरी सर्व श्रीराम भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून महा प्रसादाचा लाभ घ्यावा. अशे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले.