Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सुरेश नागरे यांच्या नेतृत्वात अजित पवार गट सक्रिय

जिंतूर :-(गुणीरत्न वाकोडे)दिनांक-27 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूर चे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत यांच्या अध्यक्षतेत व सुरेश भैय्या नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सभासद नोंदणी संदर्भात सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूर तालुक्याच्या विविध आघाड्यांच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

त्यामध्ये जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग तालुकाध्यक्षपदी गजानन वऱ्हाड, जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती विभाग तालुकाध्यक्षपदी अमित राठोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जमाती तालुकाध्यक्षपदी दिलीप माघाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटने संदर्भात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे नानासाहेब राऊत,तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत अविनाशराव काळे,राजेंद्र नागरे,अनंतराव कोरडे,केशवराव बुधवंत,बासु पठाण,राजेश चव्हाण,विनायक आडे,उस्मान खा पठाण, रामजी घुगे,जाबेर मुल्ला,गंगाधर आघाव हाशम भाई, सुधाकरराव घुगे, कुबेर हुलगुंडे,गणेश पवार,संजय घुले,प्रभाकर आघाव, भारत घुगे,गुलाब चौधरी, तहसीन देशमुख, नाना निकाळजे,वाजीद कुरेशी, गोविंद घुले, रामेश्वर मुधवर, मुजाहेद कादरी,अंशल लाला,रावसाहेब खंदारे,लखन कुरे, गणेश काकडे, अर्जुन वजीर,संदीप घुगे, सुधाकर दराडे, जगनराव काळे,आकाश चऱ्हाटे, रामा वाघ, अनिल सूर्यवंशी, सुभाष राठोड, विष्णू सानप, अमीन भाई, मुरली राठोड,आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button