राज्यमंत्री कार्यसम्राट सौ.मेघना साकोरे बोर्डीकरांच्या वाढ दिवसा निमित्त कीर्तन सोहळा:सौ.भावनाताई बोर्डीकरांची माहिती
श्रीतुळजाभवानी साखर कारखाना येथे संपन्न होणार कीर्तन सोहळा

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरांचा येत्या 10 एप्रिल रोजी वाढ दिवस असून दरवर्षीच वाढ दिवस आप्तेष्ट,पक्ष पदाधिकारी,हितचिंतक मोठ्या हर्ष उल्हासात जिल्हाभर साजरा करतात. पण या वर्षीचा वाढ दिवस दीदीस राज्याचे राज्यमंत्री पद भेटल्याने जिंतूर-सेलू मतदारसंघा सह सबंध परभणी जिल्ह्यात वाढ दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या जोमाने युध्दपातळीवर जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याच्या चेअरमन तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ.भावनाताई मुंगसे-बोर्डीकरांच्या वतीने ना. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त प.पू. परमहंस परिव्रजकाचार्य श्री 1008 आचार्य स्वामी हरीश चैतन्यानंद सरस्वती महाराज पळसखेडकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कर्तव्य बजावणारे ह भ प गुरुवर्य व कीर्तनकार,प्रवचनकार यांच्या कार्याचा गौरव व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
सदरील कार्यक्रम सेलू तालुक्यातील आडगाव (दराडे) येथील श्री.तुळजाभवानी साखर कारखाना येथे आयोजित केलेला आहे.बुधवार दि.9 एप्रिल 2025 रोजी सां.07 ते 09 दरम्यान संपन्न होणार आहे. तरी पंचकोशातील सर्व नागरिकांनी व भक्त जणांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान भावना मुंगसे-बोर्डीकर यांनी केले आहे.