Uncategorized

पहेलगामच्या भ्याड नरसंहाच्या निषेधार्थ जिंतूर कडकडीत बंद

सकल हिंदू बाधवांच्या वतीने तिव्र संताप व्यक्त करत काढला निषेध मोर्चा

 

जिंतूर –(गुणीरत्न वाकोडे)–जम्मू कश्मीर येथील पहेलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा जाहिर निषेध करत जिंतूरची बाजार पेठ व सर्व छोटे मोठे व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेऊन निषेध केला.छ.शिवाजी महाराज चौक येथे सकल हिंदू समाजाच्या बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून निषेध निवेदन दिले.जम्मु कश्मीर मधिल पहेलगाम येथे हिंदू पर्यटकांवर आतंकवाद्यांनी अत्यंत निघृणपणे हिंदू पर्यटकांची हत्या केली,या घटनेमागील प्रमुख सुत्रधारासह सर्व अतिरेक्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वत्तीने होत आहे. तसेच जिंतूरच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांच्या बळी गेलेल्या नागरिकांना छ.शिवाजी महाराज चौक येथे काल रात्री कॅण्डल लाऊन भाजपा कडून भावपूर्ण श्रद्धाजली वाहण्यात आली.
निवेदन देतांना डॉ.पंडित दराडे,गोविंद थिटे,संदीप शर्मा,रमण तोष्णीवाल,विलास भंडारे,रमेश सडाळ,बाबा जोशी,गणेश कुर्हे,मुसाभाई कुरेशी,रामकीशन रोकडे,बालाजी सांगळे,विठ्ठल रोकडे, रमेश संगेकर,केदार सोनी,रमेश गुजर,आदींची उपस्थिती होती.
चौकट
या भ्याड हल्ल्याची घटना घडतात दि.23 एप्रिल रोजीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीने मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती.या वेळी भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे यांनी या भ्याड नरसंहार हल्ल्याचा निषेधार्थ सर्व व्यापारी बांधवाना आपापली व्यवहार बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आलेले होते.

तसेच व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेश दरगड यांनीही तमाम व्यापारी बांधवानी उत्स्फूर्तपणे या बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान केलेले होते.यास प्रतिसाद देत आज शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले होते.
निषेधार्थ निवेदन दिल्या नंतर डॉ.पंडित दराडे,गोविंद थिटे व संदीप शर्मा यांनी या भ्याड नरसंहाराचा जाहीर निषेध करत आपल्या तीव्र भावना व्यक्त करत संताप व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button