Uncategorized
नामदार व पालकमंत्री सौ.मेघना बोर्डीकरांच्या वाढ दिवसा निमित्त शालेय साहित्याचे वाटप:व्यापारी महासंघाचा सामाजिक उपक्रम

नाम.पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या वाढ दिवसा निमित्त शालेय साहित्याचे वाटप
व्यापारी महासंघाचा सामाजिक उपक्रम
जिंतूर–नामदार व जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ.मेघना साकोरे बोर्डीकरांच्या वाढ दिवसा निमित्त सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेश दरगड यांच्या तर्फे शहरातील कस्तुरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी त्यांच्या समवेत भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे पाटील,
माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख,बालाजी सांगळे,ऍड.माजी नगरसेवक गोपाळ रोकडे पाटील,ऍड.सुनील मते,सरपंच-संदीप लकडे,सरपंच-तरटे अप्पा,मनोज तोडकर,पिंटू महाजनआदींची या वेळी उपस्थिती होती.