Uncategorized
मा.नगरसेवक विलास भंडारे यांची भाजप शहर मंडळाच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांच्या हस्ते नियुक्ती-पत्र प्रदान

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)-येथील माजी नगरसेवक विलास भंडारे यांची भाजपच्या जिंतूर शहर मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नियुक्तीचे पत्र माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.या वेळी भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे,माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख,सुरेश भुमरे,भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव दराडे,बंटी जाधव आदींची उपस्थिती होती.प्रदान केलेल्या नियुक्ती पत्रावर भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे यांची स्वाक्षरी आहे.त्यांच्या निवडीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर,भावनाताई बोर्डीकर,सभापती गंगाधर बोर्डीकर,माजी नगराध्यक्ष सचिन गोरे,गोविंद थिटे,प्रभाकर अप्पा वाघीकर यांनी स्वागत केले आहे.